एक्स्प्लोर
Advertisement
'पाकिस्तान की जय हो' म्हणून सोशल मीडियावर पोस्ट, संतप्त नागरिकांनी तरुणीचे घर जाळले
पण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. आगीमुळे घराचे नुकसान झाले असून त्या तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर तरुणी ही एका खासगी शाळेत शिक्षिका असून तिने तिच्या फेसबुकवर तसेच व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी ध्वज आणि पाकिस्तानचा जयजयकार केला होता.
बेळगाव : संपूर्ण देश पुलवामा मधील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आता पाकला धडा शिकवा अशी भावना व्यक्त करत असताना बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील कडबी-शिवापूर गावातील एका तरुणीने पाकिस्तान की जय हो म्हणून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने देशप्रेमी नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. जुलेका ममदापूर असे या तरुणीचे नाव असून संतप्त नागरिकांनी तिच्या घराला शनिवारी रात्री आग लावली.
पण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. आगीमुळे घराचे नुकसान झाले असून त्या तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर तरुणी ही एका खासगी शाळेत शिक्षिका असून तिने तिच्या फेसबुकवर तसेच व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी ध्वज आणि पाकिस्तानचा जयजयकार केला होता.
VIDEO | असा रचला पुलवामा हल्ल्याचा कट, काश्मीरच्या खोऱ्यातून स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
या घटनेच्या निषेधार्थ परिसरातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे. मुरुगोड पोलिसांनी या तरुणी विरोधात 124,153A या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.त्या तरुणीच्या घराला आग लावणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.यरगट्टी येथे रस्त्यावर टायर जाळून नागरिकांनी निषेध व्यक्त करून बागलकोट मार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता. मुरगोड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement