एक्स्प्लोर

Ahmedabad Metro: अहमदाबाद भुयारी मेट्रो प्रकल्पात डायाफ्राम वॉलशिवाय टीबीएम लॉन्च, भारतात पहिल्यांदाच वापरण्यात आली पद्धत

Ahmedabad Metro : प्रकल्पाचा विलंब कमी करण्यासाठी आणि कामाला गती देण्यासाठी, प्रकल्प टीमने कांकरिया स्टेशनवर डी-वॉलशिवाय टीबीएम टनेलिंग करण्याची नवीन पद्धत स्वीकारली.

अहमदाबाद :  अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. अहमदाबाद भुयारी मेट्रो प्रकल्पात पहिल्यांदाच  (Ahmedabad Underground Metro Project)  डायफ्राम वॉल (Diaphragm Wall) शिवाय टनेल बोरिंग मशीन्स (TBM) लॉन्च करण्यात आल्या आहेत. या मेट्रो प्रकल्पात देशात पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या या पर्यायी पद्धतीमुळे कांकरिया मेट्रो स्टेशनच्या बांधकामाला गती मिळण्यास मदत झाली आहे. भारतात पहिल्यांदाच मेट्रो प्रकल्पात ही पद्धत वापरण्यात आली.  यापूर्वी, इस्तान्बुल मेट्रोमध्ये ही पद्धत वापरण्यात आली होती.

अहमदाबाद मेट्रोच्या भुयारी प्रकल्पामध्ये, दोन भूमिगत स्थानके, एकूण 3.5 किमी लांबीचे जुळे बोगदे, एक कट आणि कव्हर विभाग आणि उन्नत आणि भूमिगत विभागांना जोडणारा रॅम्प बांधण्याचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Afcons Infrastructure Ltd) करत आहे.  कांकरिया स्टेशनसाठी जमीन हस्तांतरणास उशीर झाल्याने हेडवॉल (Headwall) बांधकाम ठप्प झाले होते. या कालावधीत कार्यान्वित होण्यासाठी तयार असलेले पहिले टीबीएम गतीने सुरू होऊ शकले नाही.  प्रकल्पाचा विलंब कमी करण्यासाठी आणि कामाला गती देण्यासाठी, प्रकल्प टीमने कांकरिया स्टेशनवर डी-वॉलशिवाय टीबीएम टनेलिंग करण्याची नवीन पद्धत स्वीकारली.

टॉप-डाउन (top-down) बांधकाम पद्धतीमध्ये स्टेशन बॉक्स डी-वॉल हा टीबीएम टनेलिंगच्या आधी बांधला जातो.  मात्र कांकरिया स्टेशनवर ते शक्य नव्हते. त्यामुळे ही नाविन्यपूर्ण पद्धती अवलंबली गेली. त्यामध्ये टीबीएमला सामावून घेण्यासाठी स्टेशनची रुंदी 20 मीटर  वरून 22 मीटर करण्यात आली. या नवीन पद्धती विषयी माहिती देताना, प्रकल्प व्यवस्थापक एस नक्किरन म्हणाले, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे जाणार्‍या दोन्ही मार्गांसाठी बोगदे सुरू झाले होते. त्यामुळे टीबीएम चे काम लाँचिंग शाफ्टपासून सुरू करण्यात आले.  दोन्ही मार्गांचे बोगदे कायमस्वरूपी रिंग बांधून सुरळीत पूर्ण झाले आणि नंतर कालुपूर स्टेशनवर टीबीएम बाहेर काढण्यात आले. टीबीएम (TBM) च्या व्यवस्थित कामाच्या खात्री करण्यासाठी, टीमने अर्थ प्रेशर सेन्सर (earth pressure sensor) साठी इन-हाऊस कॅलिब्रेशन युनिट देखील विकसित केले.  कधीकधी, जेव्हा सेन्सर चिखलाने झाकाळतो तेव्हा सेन्सर्सच्या अर्थ प्रेशरच्या कामामध्ये अडथळे येतात.  

कांकरिया स्थानकावरील कामाला गती देण्यासाठी अनुक्रम पद्धतीऐवजी समांतर बांधकाम पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यामुळे  मुख्य स्टेशन बॉक्सचे बांधकाम नियोजित वेळेपेक्षा चार महिने अगोदर पूर्ण करू शकलो आणि ओव्हर ट्रॅक एक्झॉस्ट (OTE) डक्टची उभारणी निर्धारित वेळेच्या पाच महिने आधी झाली.  गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन (Gujrat Metro Rail Corporation) ने ही या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे, ते पुढे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget