त्याने लग्नासाठी चक्क 'टाटा नॅनोला हेलिकॉप्टर' बनवले! तुम्हाला बुक करता येणं शक्य
Tata Nano Modified As Helicopter : आयुष्यात लग्नाचा समारंभाचा क्षण संस्मरणीय व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेकजण थीमवर आधारित लग्न करतात तर कोणी रथ घेऊन तर कोणी बुलेटवर स्वार होऊन वधूला घेण्यासाठी पोहोचतात.
Tata Nano Modified As Helicopter : आयुष्यात लग्नाचा समारंभाचा क्षण संस्मरणीय व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेकजण थीमवर आधारित लग्न करतात तर कोणी रथ घेऊन तर कोणी बुलेटवर स्वार होऊन वधूला घेण्यासाठी पोहोचतात. पण आता तर अनेक लग्नसमारंभातही हेलिकॉप्टरचा वापर केला जात असल्याची गोष्टी पाहायाला मिळत आहेत पण प्रत्येकाला हे काणी खिशाला परवडणार नाही. परंतू आता कमी पैशात लग्नासाठी म्हणून तुम्ही एका पठ्ठ्याने टाटा नॅनो गाडीला हेलिकॉप्टर बनवलेले वापरु शकता.
बिहारमधील एका व्यक्तीने असे हेलिकॉप्टर बनवले आहे, ज्याचं भाडे थोडंसं कमी आहे. विशेष म्हणजे टाटाच्या नॅनोला त्यांनी हेलिकॉप्टरचा आकार दिला आहे. लग्नसमारंभात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या गाडीच्या पाठीला पंख आहेत. मात्र, ते सामान्य हेलिकॉप्टरप्रमाणे उडू शकत नाही.
आतापर्यंत 19 जणांकडून बुकिंग -
नॅनोचे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर करणारी व्यक्ती बिहारमधील बगाहा येथील रहिवासी आहे. गुड्डू शर्मा असे त्याचे नाव आहे. त्यांनी दोन लाख रुपये खर्च करून नॅनो कारला हेलिकॉप्टर बनवले आहे. गुड्डूने सेन्सरचा वापर करून हा बदल केला आहे. विशेष म्हणजे लग्नासाठी लोकांकडून याकरिता बुकिंगही जोरदारपणे सुरु आहे. आतापर्यंत 19 जणांनी ही गाडी बुक केली आहे. त्याचे भाडे 15,000 रुपये आहे. असे हेलिकॉप्टर बनवण्यासाठी दीड लाखांहून अधिक रुपये लागतात, तर त्याला हायटेक लूक देण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त खर्च येईल, असं गुड्डूनी सांगितलं. सध्या यावर आणखी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कशी सुचली हेलिकॉप्टर बनवण्याची कल्पना -
लग्नादरम्यान हेलिकॉप्टर बुक करण्याबाबत लोकांमध्ये खूप उत्साह असतो. त्याची मागणीही खूप आहे. अशा परिस्थितीत लग्नाला हेलिकॉप्टरने जावे, अशी अनेकांची इच्छा असते, परंतु हेलिकॉप्टरचं भाडे जास्त असल्याने सर्वांना ते शक्य होत नाही. म्हणूनच मी माझ्या टाटा नॅनो कारमध्ये बदल करून हेलिकॉप्टरचे डिझाईन तयार केलं जेणेकरून लोकांना त्यांची आवड कमी खर्चातही पूर्ण करता येतील.
आत्मनिर्भर भारताचे उदाहरण -
शर्मा यांनी टाटा नॅनोला हेलिकॉप्टरचा लुक देण्यासाठी मेटल शीट वापरून मुख्य रोटर, टेल बूम आणि टेल रोटर जोडले. ते सध्या नॅनोला अधिक आकर्षक लूक देण्यासाठी लग्नासाठी भाड्याने देण्यावर काम करत आहे. डिजिटल इंडियाच्या युगात त्यांचा हा शोध स्वावलंबी भारताचे उदाहरण असल्याचं शर्मा म्हणतात.
याआधीही अशीच अप्रतिम कामगिरी -
गुड्डूच्या आधी बिहारच्या छपरा जिल्ह्यात राहणाऱ्या मिथिलेशनेही टाटा नॅनोचे हेलिकॉप्टर बनवले आहे. त्यांनी सात महिन्यांत ते तयार केले होते. त्याने फक्त त्यात सुधारणा केली. ते बनवण्यासाठी त्यांनी 7 लाख रुपये खर्च केले होते.