तनिष्कच्या आणखी एका जाहिरातीवर वाद, कंपनीवर महिनाभरात दुसऱ्यांदा जाहिरात मागे घेण्याची नामुष्की
टाटा समुहाच्या मालकीच्या तनिष्कने आपली आणखी एक जाहिरात तात्पुरत्या स्वरुपात मागे घेतली आहे. सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगमुळे कंपनीला एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा जाहिरात मागे घ्यावी लागली.
मुंबई: टाटा समुहाच्या मालकीच्या आभूषण ब्रँड तनिष्कला त्यांची आणखी एक जाहिरात मागे घ्यावी लागली आहे. या आधीची जाहिरात एकत्वम धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरुन मागे घेण्यात आली होती. त्यामध्ये एका हिंदू महिलेला मुस्लिम घराची सून दाखवण्यात आले होते.
कंपनीच्या या नव्या जाहिरातीत नीना गुप्ता, निमरत कौर, सयानी गुप्ता आँणि अलाया यांनी काम केले आहे. ही जाहिरात कंपनीच्या सोशल मीडियावरुन गेल्या गुरुवारी प्रसिध्द करण्यात आली होती.
या जाहिरातीत सयानी गुप्ता असे म्हणताना दाखवले आहे की, "मी दीर्घ कालावधीनंतर माझ्या आईला भेटायची आशा करते. यावेळी मी निश्चितुपणे फटाके उडवणार नाही आणि मला वाटत नाही की कोणीही फटाके उडवावेत, पण त्याबदल्यात खूप साले दिवे लावावेत."
परंतु या दिवाळीत फटाके उडवू नये अशा प्रकारचा सल्ला देण्यात आलेल्या या जाहिरातीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलचा सामना करावा लागत आहे.
भाजपचे महासचिव सी.टी.रवी यांनी ट्विट केले आहे. त्यात लिहले आहे की, "हिंदूंचे सण कशा प्रकारे साजरे करायचे याबद्दल कोणा आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही. कंपनीने आपल्या उत्पादन विक्रीवर ध्यान द्यावे, त्यांनी फटाके फोडण्यावर भाषणबाजी करु नये."
कंपनीच्या 50 सेकंदच्या या जाहिरातीला ट्विटर आणि युट्युब पेजवरुन हटवण्यात आले आहे. परंतु इन्स्टाग्रामच्या पेजवर अजूनही ही जाहिरात पहायला मिळते. याबाबत कंपनीने कोणतीही टिप्पणी करायला नकार दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
#BoycottTanishq ट्विटरवर ट्रेण्ड; नक्की कारण काय?