एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : व्यायामाचा बहाणा करुन रस्त्यावरील बल्बची चोरी
पहाटेच्या काळोखाचा फायदा घेत बल्ब लंपास करणाऱ्या तामिळनाडूतील व्यक्तीची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
चेन्नई : व्यायाम करत असल्याचं भासवून रस्त्यावरील बल्ब चोरणाऱ्या एका इसमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहाटेच्या काळोखाचा फायदा घेत बल्ब लंपास करणाऱ्या या व्यक्तीची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
तामिळनाडूतील कोइम्बतूरमधील चेरण मा नगर परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. चोरीची ही घटना 23 जूनला पहाटे पाच वाजता घडली.
हाताचं स्ट्रेचिंग करुन व्यायाम करत असल्याचं संबंधित व्यक्ती भासवत आहे, पण प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला असलेले बल्ब हातचलाखीने तो खिशात टाकताना दिसतो. रस्त्यावरुन वाहनं जात असल्यामुळे त्याची घाई-गडबड सुरु आहे.
सॉकेटमधून काढलेला बल्ब खिशात जाताच काहीच न घडल्याप्रमाणे तो काढता पाय घेतो. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचं त्याच्या ध्यानीमनीही नाही
'पुथिया थलैमुराई' या तमिळ वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ सर्वात आधी शेअर केला होता. त्यानंतर अल्पावधीतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement