एक्स्प्लोर

इन्फोसिसच्या स्वातीच्या मारेकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

चेन्नई : इन्फोसिसची कर्मचारी स्वातीच्या हत्याप्रकरणात नवाच थरार अनुभवास आला. तामिळनाडू पोलिसांनी स्वातीच्या मारेकऱ्याचा छडा लावला. पण पोलीस पकडण्यासाठी आल्याचं पाहताच, इंजिनिअर आरोपीने स्वत:ही गळा कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याच आरोपीने गेल्या शुक्रवारी भरदिवसा रेल्वे स्टेशनवर स्वातीची गळा चिरुन हत्या केली होती.   राम कुमार असं या आरोपीचं नाव असून, त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.   काय आहे प्रकरण? चेन्नईतील एका रेल्वे स्थानकावर इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्रांनी हत्या झाली. धक्कादायक बाब म्हणजे घटनेदरम्यान रेल्वेस्थानकावर गर्दी होती. मात्र, या तरुणीला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. शिवाय, जवळपास दोन तास मृतदेह रेल्वेस्थानकावरच पडून होतं. स्वाती असं या मृत तरुणीचं नाव आहे.   काय झालं प्लॅटफॉर्मवर?  स्वाती जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी होती. त्यावेळी काळी पँट परिधान केलेला एक तरुण मागून आला आणि स्वातीशी काही वेळ बोलला. त्यानंतर आपल्या बॅगमधून धारदार शस्त्र काढून तिच्यावर हल्ला केला. त्यातच स्वातीचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.   चेहरा आणि गळ्यावर वार  पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार केले गेले. प्लॅटफॉर्मवर काही अंतरापर्यंत रक्त पसरलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे प्लॅटफॉर्मवर गर्दी असतानाही, कुणी वाचवण्यासाठी पुढे आला नाही. किंवा हत्या करणाऱ्या तरुणाला पकडण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही.   आरोपीचा छडा याप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी आठवडाभरातच आरोपीचा शोध लावला. चेन्नईपासून 630 किमी अंतरावरील तिरुनेलवेल्ली जिल्ह्यातील सेंगोट या गावात आरोपी असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. मात्र आपल्या दिशेने पोलिस येत असल्याचं दिसताच, 24 वर्षीय राम कुमारने स्वत:च्या गळ्यावर चाकू फिरवला.   हत्येचं कारण संगोटे येथे राहणारा राम कुमार नोकरीनिमित्त चेन्नईत आला होता. स्वाती ज्या परिसरात राहते, तिथेच राम कुमारही राहात होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो इथे वास्तव्यास होता. मात्र या दोघांची ओळख होती का, किंवा हत्येचं काय कारण होतं, याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

संबंधित बातमी

चेन्नईत भरदिवसा इन्फोसिसच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget