एक्स्प्लोर

Swami Vivekananda Death Anniversary : धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात...

Swami Vivekananda : भारताचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची आज पुण्यातिथी साजरी केली जात आहे. अध्यात्मिक ज्ञानामुळे आणि प्रभावशाली बुद्धीमुळे त्यांनी जगभरात एक वेगळीच छाप उमटवली आहे.

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी, 1863 रोजी झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. 1893 मध्ये शिकागो, अमेरिका येथे भरलेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. स्वामी विवेकानंदांच्या वक्तृत्वामुळेच भारताचा वेदांत अमेरिका आणि युरोपातील प्रत्येक देशात पोहोचला. त्यांनी 'रामकृष्ण मिशन' या नावाची संन्याशांची संस्था स्थापन केली. भारतीय ज्ञान आणि वेदांत तत्वज्ञानाचे दर्शन पाश्चिमात्यांना करुन देणारे आणि अध्यात्माच्या जगतात वेगळाच ठसा उमटवणाऱ्या स्वामी विवेकानंदांची आज पुण्यतिथी देशभरात साजरी केली जात आहे. धर्म, मानवता, स्वातंत्र्य, वेदांत तत्वज्ञान यांसारख्या इतर अनेक विषयांवर त्यांचे विचार नेहमीच प्रत्येक भारतीयांना मार्गदर्शक ठरतात. धर्माच्या विषयावरील त्यांचं ज्ञान विशाल होतं.

स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकात्यात झाला. त्यांच मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त. त्यांचे वडील कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते तर आई भूवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या.

स्वामी विवेकानंदानी शिकागो येथे सुमारे 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म संमेलनात भाग घेतला. त्या ठिकाणी विवेकानंदानी धर्म आणि मानवता यावर केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा आजही प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. शिकागोमध्ये गेल्यानंतर विवेकानंदांनी भारतीय धर्म, मानवता आणि संस्कृतीवर दिलेल्या भाषणाने अनेकांना आश्चर्यचकीत केलं.

अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर विवेकानंदानी संपूर्ण देश पालथा घातला. त्यांनी भारताच्या गरीबी, गुलामी आणि जातीय व्यववस्थेचं चिंतन केलं. वेदान्त तत्वज्ञानावर त्यांनी भारतभर भाषणं दिली. विवेकानंदानी 1 मे 1897 साली कोलकाता येथे 'रामकृष्ण मिशनची' स्थापना केली. तसेच 9 डिसेंबर 1898 रोजी गंगेच्या किनारी बेलूर येथे रामकृष्ण मठाची स्थापना केली.

धर्माच्या बाबतील विवेकानंदांचे विचार प्रगतीशील होते. विवेकानंद कोणत्याही धर्माचा तिरस्कार करत नव्हते. त्यांनी भारतासमोर आणि जगासमोर वेदांत तत्वज्ञानाची मिमांसा केली ती नक्कीच धर्माचे खऱ्या अर्थाने चिंतन करते. विवेकानंद म्हणायचे की, आपण वेदांताशिवाय श्वासही घेऊ शकणार नाही, मनुष्याच्या जीवनात जे काही घडतंय ते वेदांताच्या प्रभावातूनच घडतंय.

विवेकानंदांच्या मते वेदांत तत्वज्ञान हेच खऱ्या अर्थाने धर्माची शिकवण देणारे आहे. वेगवेगळ्या धर्मातील चांगल्या गोष्टी कशा स्वीकारायच्या ते वेदांत तत्वज्ञानामधून शिकता येतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे की, हिंदू धर्माचा खरा संदेश हा मनुष्याला वेगवेगळ्या संप्रदायात विभागणी करणे नसून सर्वांना मानवतेच्या एका सूत्रात बांधणे हा आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Embed widget