एक्स्प्लोर
Advertisement
Swami Agnivesh passes away | सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन
सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे निधन झाल्याची माहिती.
नवी दिल्ली : आर्य समाजचे प्रसिद्ध नेते स्वामी अग्निवेश यांचं आज निधन झाले. 80 वर्षीय स्वामी अग्निवेश यांची मंगळवारी प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती आणखी खालवली आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.
स्वामी अग्निवेश यांनी नवी दिल्लीतील इंस्टिट्यूट ऑफ लिवर अँड बिलेरी सायन्सेस (आयएलबीएस) मध्ये भरती करण्यात आले होते. ते लिवर सिरोसिसने ग्रस्त होते. उपचारादरम्यान मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले.रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्वामी अग्निवेश यांना सायंकाळी सहा वाजता हार्ट अॅकट आला. शेवटी त्यांच्या मुख्य अवयवयांनी काम करणं बंद केलं. मंगळवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वरिष्ठ डॉक्टरांचं एक पथक त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होतं मात्र त्यांची प्राणज्योत आज मालवली. साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.Social activist Swami Agnivesh (in file pic) passes away at the Institute of Liver and Biliary Sciences, Delhi. He was suffering from liver cirrhosis and was critically ill. pic.twitter.com/wZdK5i7mA1
— ANI (@ANI) September 11, 2020
थोडक्यात माहिती
1970 मध्ये आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता.
1977- हरियाणा मध्ये शिक्षण मंत्री म्हणूनही पदभार.
2011- अण्णांच्या आंदोलनात सहभाग, मात्र नंतर मतभेदांमुळे दूर.
बिगबॉस मध्ये सुद्धा आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement