Adhir Ranjan Chaudhary : अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन, सरकार विरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला
No Confidence Motion Rejected : अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
Adhir Ranjan Chawdhary Suspension : काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chawdhary) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. लोकसभेत आवाजी मतदान करुन सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला आहे. सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचं 10 ऑगस्ट रोजी, गुरुवारी लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी विशेषाधिकार समित चौकशी करेल, त्यानंतर समितीचा अहवाल येईल अधीर रंजन चौधरी यांचं संसदेतून निलंबन करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी म्हटलं की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी प्रत्येक वेळी देश आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्यावेळी त्यांच्याकडून माफीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी माफी मागितली नाही. त्यांच्याविरोधातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांची नीरव मोदीशी तुलना
अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींबाबत वक्तव्य करत म्हटलं होतं की, ''धृतराष्ट्र आंधळा होता, आजही राजा आंधळाच आहे. मणिपूर आणि हस्तिनापूरमध्ये फरक नाही. नरेंद्र मोदी नीरव मोदीसारखे शांत बसले आहेत. भाजपने मणिपूरच्या खासदाराला संसदेत बोलण्याची संधी दिली नाही.''
अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ
अविश्वास प्रस्तावावर गुरुवारी संसदेत जोरदार चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांचा मोठा गदारोळ पाहायला मिळाला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवेळी अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. मणिपूरच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "2018 मध्ये, सभागृह नेता म्हणून मी त्यांना 2023 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काम दिले होते. आता मी त्यांना 2028 मध्ये आणण्याचे काम देत आहे, पण किमान तयारी करून या. जेणेकरुन जनतेला तरी तो विरोधी पक्षाची पात्रता समजेल."
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2018 मध्ये अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, विरोधक 2023 मध्येही अविश्वास प्रस्ताव आणतील. आता पीएम मोदींनी पुन्हा एकदा 2024 च्या निवडणुकीतील विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा दावा केला असून 2028 मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील असं म्हटलं आहे.