एक्स्प्लोर
Advertisement
संरक्षणमंत्रिपदासाठी गडकरी, प्रभू आणि सुषमा स्वराज यांची नावं चर्चेत!
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याचा भार अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकडे हे खातं जाणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या (रविवारी) सकाळी 10 वाजता विस्तार होणार आहे. या विस्तारात संरक्षण मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, संरक्षणमंत्रीपदासाठी सुरेश प्रभू, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांची नावं आघाडीवर आहेत.
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर या खात्याचा भार अर्थमंत्री अरुण जेटलींकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकडे हे खातं जाणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सुत्रांच्या मते, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथूर यांचंही नाव संरक्षणमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. तसेच त्यांच्यासोबत ज्येष्ठ मंत्री नरेंद्र तोमर यांचंही नाव चर्चेत आहे.
दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी सुरेश प्रभूंनी रेल्वे मंत्रिपदाचा कारभार सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे फेरबदलात संरक्षण कुणाला मिळणार? प्रभूंचं काय होणार? याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
संबंधित बातम्या :
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना अजूनही वेटिंग लिस्टवरच!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement