Gujrat News : समुद्रात बुडालेला मुलगा 24 तासांनंतर सुखरुप परतला, वादळी लाटांशी झुंज यशस्वी
Surat CR Patil News : समुद्रामध्ये बुडाल्यानंतर 24 तासाने मुलगा जिवंत सापडला आहे. नवसारी येथील रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
Surat News : समुद्रात बुडाल्यानंतर 24 तासांनी मुलगा जिवंत सापडल्याची घटना सूरतमध्ये घडली आहे. सुरत येथे हा मुलगा समुद्रात बुडाला होता. समुद्र किनारी अंघोळ करताना हा मुलगा वालुकामय किनाऱ्यावरून समुद्रात ओढला गेला होता. त्या 14 वर्षीय मुलाला जीवदान मिळालं आहे. नवसारी येथील रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.समुद्रात बुडाल्याच्या 24 तासानंतर सुखरूप परतलेल्या 14 वर्षीय मुलाची भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील (BJP Chirf Gujarat CR Patil) यांनी रुग्णालयात त्याची भेट घेतली.
24 तास समुद्राच्या वादळी लाटांशी झुंज
सुरतच्या डुमास येथे 14 वर्षीय मुलगा समुद्रात बुडाला होता. 24 तास समुद्राच्या वादळी लाटांशी झुंज दिल्यानंतर मुलगा सुखरूप परतला आहे. सुरतमध्ये 24 तास समु्द्राशी झुंज दिल्यानंतर जीवदान मिळवलेल्या मुलाचं नाव लखन असं आहे. लखनची नवसारीतील नवदुर्गा बोटीतून मच्छीमारांनी सुटका केली. आज, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 तासांनंतर लखनला ढोलाई बंदरात सुखरूप आणले. तेव्हा वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर प्राथमिक उपचारासाठी लखनला तातडीने 'आयसीयू ऑन व्हील्स'च्या मदतीने पुढील उपचारासाठी नवसारी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं.
समुद्रात बुडालेला मुलगा 24 तासांनंतर सुखरुप परतला
सुरतमध्ये समुद्रात बुडून 24 तासांनंतर जिवंत सापडलेल्या मुलालाला भेटण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील रुग्णालयात पोहोचले. सी.आर.पाटील यांनी नवसारी येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या मुलाच्या तब्येतीची विचारपूस केली. खासदार सी.आर.पाटील यांनी मुलाशी संवाद साधत त्याला सांगितलं की, 'आता वाचल्यानंतर आयुष्यात काहीतरी चांगलं करुन दाखवा, डॉक्टर व्हा आणि इतरांचे प्राण वाचवा.'
नक्की काय घडलं?
सुरतजवळील गोदादरा येथे राहणारे विकास लाभू देवीपूजक यांची लखन, करण ही दोन मुले आणि मुलगी अंजली हे त्यांची आजी सविताबेन यांच्यासह गेल्या 29 सप्टेंबर रोजी पूनमला सुरत येथील पार्लेपॉइंट येथील अंबाजी मंदिरात गेले होते. तेथून आजीने तिन्ही मुलांना डुमसच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला नेलं. समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यावर 14 वर्षांचा लखन, 11 वर्षाचा करण आणि सविता आजीकडे दुर्लक्ष करून समुद्रात आंघोळीसाठी गेले.
समुद्रात आंघोळ करणासाठी गेलेला लखन भरती आल्याने समुद्रात ओढला केला आणि बुडाला. त्यानंतर अग्निशमन दल आणि जलतरणपटूंनी त्याला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं पण, त्याचा शोध लागला नाही. अखेर 24 तासांनंतर लखन मच्छिमारांना सापडला. त्यामुळे लखनचे प्राण वाचले. समुद्राच्या पाण्याशी झुंज देत 24 तास जिवंत राहिलेल्या लखनला धोलाई बंदरातून थेट नवसारी येथील खासगी नवसारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवसारी सामाजिक कार्यक्रमासाठी आलेले खासदार सी.आर.पाटील कार्यक्रम आटोपल्यानंतर थेट निराली हॉस्पिटलमध्ये गेले, तेथे त्यांनी किशोरशी बोलून प्रकरणाची माहिती घेतली.