एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

सूरतच्या ONGC गॅस पाईपलाईनमध्ये भीषण आग, स्फोटांनी हादरला परिसर

सूरतच्या ONGC मध्ये झालेले स्फोट इतके भीषण होते की दहा किलोमीटरपर्यंत या स्फोटांचे आवाज ऐकू आले. या ठिकाणी पहाटे चार पासूनच आग विझवण्याचे काम अग्निशामन दलाच्या जवानांकडून केलं जात होतं.

सूरतः गुजरातच्या सूरतमध्ये असलेल्या ओएनजीसी गॅस प्लॅंटमध्ये भीषण आग लागली आहे. ही आग फार भयानक असून अजूनही स्फोटाचे आवाज येत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

आजूबाजूच्या गावातील लोकांनी सांगितलं की, ONGC गॅस प्लॅंट स्फोट इतका भयानक होता की, स्फोटाच्या वेळी घराचे दारे खिडक्या भूकंप झाल्यासारखं हादरत होत्या. सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी ABP न्यूजशी बोलताना सांगितलं की,  'आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक तहसीलदार आणि प्रशासनातील अन्य अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि यावर लक्ष ठेवून आहेत.'

धवल पटेल यांनी सांगितलं की, आतापर्यंत या घटनेत जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही. तसंच या स्फोटाचं कारण देखील समोर आलेलं नाही.  धवल पटेल यांनी सांगितलं की ONGC  गॅस प्लॅंट मध्ये लागलेली आग ही सध्या ऑन साईट इमरजेंसी अशा स्थितीत आहे. त्यांनी सांगितलं आहे की, ऑफ साइट इमरजेंसी नसल्यानं आजूबाजूच्या लोकांनी घाबरण्याची गरज नाही.

 प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, ओएनजीसीमध्ये झालेले हे स्फोट इतके भीषण होते की दहा किलोमीटरपर्यंत ते ऐकू आले. या ठिकाणी पहाटे चार पासूनच आग विझवण्याचे काम अग्निशामन दलाच्या जवानांकडून केलं जात होतं.

धवल पटेल यांच्या माहितीनुसार तीन वाजण्याच्या सुमारास प्रकल्पाच्या टर्मिनल्समध्ये लागोपाठ तीन मोठे स्फोट झाले. त्यानंतर येथील टर्मिनल दोनला आग लागली. सध्या या प्रकल्पामध्ये साठवून ठेवण्यात आलेला नैसर्गिक गॅसचा साठा डिप्रेशराइज करण्याचे काम सुरु आहे असं पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? पोस्टरवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 04 October 2024NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? पोस्टरवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत
बच्चू कडूंना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल पक्ष सोडणार? पोस्टरमधून मोठे संकेत
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा, परदेशातील भीषण वास्तव
Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget