एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिल्या आहेत. यासाठी कोर्टानं सरकारला तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. सिटीझन्स रिसोर्स अॅन्ड अॅक्शन इनिशिएटिव्ह (CRANTI) या स्वयंसेवी संस्थेने 2014 मध्ये याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी वेळी न्यायालयाने हे आदेश दिलेत. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती जे.एस. खेहर यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरु असून, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिली जाणारी मदत पुरेशी नाही. उलट आत्महत्येच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय योजण्याची गरज असल्याचं मत खंडपीठानं यावेळी व्यक्त केलं. विशेष म्हणजे, या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं गेल्याच महिन्यात केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना नोटीसही पाठवली होती. CRANTI ने या याचिकेच्या माध्यमातून गुजरातमध्ये 2003 ते 2013 दरम्यान 619 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं. तसेच या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत म्हणून देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मात्र, देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत असल्याने,  यावर ठोस उपाय योजण्याची गरज असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारच्यावतीनं शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना, आणि इतर योजनांची माहिती न्यायालयाला देण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या गेल्या अनेक दशकांपासून जैसे थेच आहे. यावर ठोस उपाय योजण्यात कोणालाही यश आलं नाही. त्यामुळे सरकारचा यावर कोणती पावलं उचलत आहे? असा प्रश्न न्यायालयानं सरकारी वकीलांना विचारला. दरम्यान, आता या प्रकरणावर पुढील सुनावणी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. एबीपी न्यूजशी बोलताना याचिकाकर्त्यांचे वकील कॉलिन गोंजाल्विस यांनी सांगितलं की, '' वास्तविक, सरकारजवळ कोणतीही उपाय योजना नाही. त्यामुळे सरकार आपल्या योजनांची माहिती देण्याचं काम करतंय. पण त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे. त्यामुळेच न्यायालयाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. आता सरकारला गांभीर्यानं विचार करुन उत्तर देण्याची गरज आहे.''

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget