एक्स्प्लोर
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शशीकलांचं राजकीय भवितव्य ठरणार

चेन्नई : तामिळनाडुच्या राजकीय घडामोडींमध्ये एआयएडीएमके पक्षाच्या महासचिव शशीकला नटराजन यांचं राजकीय भविष्य मंगळवारी निश्चित होणार आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळल्याप्रकरणी त्यांच्यावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय शशीकलांच्या बाजूने आला, तर मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना पुढे तडजोड करता येईल. अन्यथा त्यांना तुरुंगात जावं लागेल आणि सहा वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नाही. काय आहे प्रकरण? तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता, शशीकला आणि त्यांच्या दोन नातेवाईकांना 66 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसंच बंगळुरुच्या कोर्टाने 100 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर 2015 मध्ये कर्नाटक हायकोर्टाने सर्वांची सुटका केली होती. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला तर मुख्यमंत्री बनण्यासाठी शशीकलांचा मोठा अडथळा दूर होईल.
संबंधित बातमी :
जयललितांच्या मृत्यूची चौकशी करा, पन्नीरसेल्वम यांचे आदेश
मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव टाकला : पन्नीरसेल्वम
शशिकला नटराजन तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री
जयललितांच्या खुर्चीवर न बसणारा मुख्यमंत्री – ओ पन्नीरसेल्वम!
जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशिकला कोण?
जयललिता यांच्यानंतर AIADMK ची धुरा शशिकला यांच्याकडे?
आणखी वाचा























