पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन, निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा अध्यक्ष
Supreme Court on PM Modi Security Breach : सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींप्रकरणी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
Supreme Court on PM Modi Security Breach : पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या समितीचे अध्यक्ष असणार असून त्यांच्या व्यतिरिक्त इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असणार आहे. एनआयए डीजी, पंजाबचे एडीजीपी, चंदीगडचे डीजीपी यांचा समितीत समावेश असणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, अशा प्रकरणाची एकतर्फी चौकशी होऊ शकत नाही, असे आमचे मत आहे. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती या प्रकरणं पाहणार आहे.
समिती स्थापन करण्याचा मुख्य हेतू काय?
- सुरक्षेत काय चूक झाली?
- जबाबदारी कोणाची?
- भविष्यात असं घडू नये यासाठी काय करता येईल?
- समिती लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करेल.
कमिटीचे सदस्य :
- जस्टिस इंदु मल्होत्रा (अध्यक्ष)
- एनआयएचे डीजी किंवा त्यांचे नियुक्त अधिकारी आयजीच्या दर्जापेक्षा कमी नाहीत
- चंदिगडचे DGP
- पंजाबचे ADGP (सिक्युरिटी)
- पंजाब-हरियाणा हायकोर्टचे रजिस्टार जनरल
लॉयर्स व्हॉईस नावाच्या संस्थेकडून याचिका दाखल
लॉयर्स व्हॉईस नावाच्या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी संस्थेनं न्यायालयाकडे केली होती. गेल्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाच्या निदर्शनास आले की, पंजाब आणि केंद्र सरकारनं त्यांच्या वतीनं तपास करण्यासाठी काही समित्यांची स्थापना केली आहे. सुनावणीदरम्यान, दोन्ही सरकारांनी एकमेकांच्या समिती सदस्यांना प्रश्न विचारून त्यांच्या निःपक्षपातीपणावर शंका उपस्थित केली. त्याच दिवशी, न्यायालयानं सूचित केलं होतं की, ते चौकशीसाठी आपल्या वतीने एक समिती स्थापन करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा बुधवारी फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळं उड्डाणपुलावर अडकून पडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान मोदींची यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यावरुन संपूर्ण देशभरातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पोलिसांकडूनच चूक? पोलिसांनी आंदोलकांना मार्गाची माहिती लीक केल्याचा दावा
- PM Modi Security : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा भंगप्रकरणी उच्च स्तरीय समिती स्थापन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह