एक्स्प्लोर

टाटांच्या 'ताज'चा ई-लिलाव होणार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील उच्चभ्रू अशा मानसिंग मार्गावरील 11 मजली अलिशान पंचतारांकित 'ताज मानसिंग' हॉटेलच्या ई-लिलावाला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदिल दाखवला आहे. जर लिलावात टाटा ग्रुपला यश मिळत नसेल, तर त्यांना हॉटेल रिकामं करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी द्यावा, असे सुप्रीम कोर्टाने नवी दिल्ली महानगरपालिकेला (एनडीएमसी) सांगितले आहे. याआधी एनडीएमसीने 'ताज मानसिंग'च्या ई-लिलावाबाबत सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडला (IHCL) सांगितलं आहे की, जर तुम्हाला यसंदर्भात काहीही आक्षेप असेल, तर एका आठवड्यात उत्तर दाखल करा. याच वर्षी 12 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने एनडीएमसीला टाटा ग्रुपचं लीज न वाढवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे सूचवले होते. एनडीएमसीने या प्रकरणी योग्य कारवई न केल्याचा ठपकाही ठेवला आणि कायदेशीर अधिकाऱ्यांचं मत उजेडात आणलं नाही, ज्यामध्ये टाटा ग्रुपला लीज वाढवण्यास सांगितले होते. एनडीएमसीने सहा महिन्यात निर्णय घ्यावा आणि कोर्टात त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा. मात्र, हॉटेलच्या लिलावादरम्यान टाटा ग्रुपलाच पहिलं प्राधान्य द्यावं. मात्र, जर ते लिलावत ठरवेली रक्कम देऊ शकले नाहीत, तर जी मोठी बोली लागेल, त्यांना लीज द्यावं, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. याआधी टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने लिलावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ती याचिका 27 ऑक्टोबरला दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आणि नवी दिल्ली महानगरपालिकेला हॉटेलच्या लिलावाला हिरवा कंदिल दाखवला. मात्र, टाटा ग्रुपने सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते. मात्र, आता सुप्रीम कोर्टानेही एनडीएमसीच्या बाजूने निर्णय दिला आहे. टाटा ग्रुपचं 'ताज मानसिंग' हे हॉटेल 1976 मध्ये आयएचसीएलला 33 वर्षांसाठी लीजवर दिले होते. मूळ संपत्ती ही एनडीएमसीच्या मालकीची आहे. मात्र,  2011 मध्ये लीज संपल्यानंतरही टाटा ग्रुपने वेगवेगळ्या आधारावर लीजचा विस्तार करुन व्यावसाय सुरु ठेवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Embed widget