एक्स्प्लोर

सुनंदा पुष्कर मृत्यू : थरुरांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका

सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांचं नाव आरोपपत्रात दाखल करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा गुंता चार वर्षांनंतरही सुटलेला नाही. त्यातच सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. सुनंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी थरुर यांचं नाव आरोपपत्रात दाखल करण्यात आलं आहे. शशी थरुर यांनी पत्नीशी क्रूर वर्तन केल्याचा आरोपही दिल्ली हायकोर्टात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत, मात्र त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्या काहीही खात नव्हत्या, रुमबाहेर पडत नव्हत्या, असं समोर आल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये आहे. तीन हजार पानांच्या आरोपपत्रात केवळ थरुर यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला आहे. आपल्यावरील आरोप विसंगत आणि हास्यास्पद असल्याचा दावा शशी थरुर यांनी ट्विटरवर केला आहे. ही चार्जशीट राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं 'एम्स' रुग्णालयाने म्हटल्यानंतर जानेवारी 2015 मध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचं मृत्यूच्या दिवशीच उघड? 'हॉटेल लीलामधील घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर सुनंदा यांनी आत्महत्या केली नाही, हे स्पष्ट आहे. प्राथमिक ऑटोप्सी रिपोर्टनुसार सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला' असं दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक आणि गुप्त तपास अहवालात नमूद केल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. मात्र सुनंदा यांनी आत्महत्या केल्याचं आता पोलिसांनी म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सुनंदा पु्ष्कर 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या 345 क्रमांकाच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुनंदा यांनी 2010 मध्ये शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!
माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!
election commission of india : हायकोर्टाने निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याला निवडणुकीची कागदपत्रे देण्यास सांगितलं; केंद्राकडून निवडणूक नियमात बदल
हायकोर्टाने निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याला निवडणुकीची कागदपत्रे देण्यास सांगितलं; केंद्राकडून निवडणूक नियमात बदल
Manikrao Kokate : छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 22 December 2024Raj Thackeray Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कानात कुजबुजले, राज ठाकरे सुद्धा चांगलेच हसलेSharad Pawar Bheemthandi Yatra : भीमथडी यात्रेला शरद पवारांची उपस्थिती, देवेंद्र फडणवीसांचा थेट फोनRaj Thackeray Uddhav Thackeray : राज-उद्धव आणि रश्मी ठाकरेंमध्ये रंगला संवाद, भेटीचं कारण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!
माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!
election commission of india : हायकोर्टाने निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याला निवडणुकीची कागदपत्रे देण्यास सांगितलं; केंद्राकडून निवडणूक नियमात बदल
हायकोर्टाने निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्याला निवडणुकीची कागदपत्रे देण्यास सांगितलं; केंद्राकडून निवडणूक नियमात बदल
Manikrao Kokate : छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'
K P Patil : ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!
ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Uddhav Thackeray Nephew Wedding : राज ठाकरेंच्या भाच्याचा विवाह, उद्धव आणि रश्मी ठाकरेंची उपस्थिती
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल
Mumbai : ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
Embed widget