Delhi Earthquake : दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळमध्ये केंद्र तर 6.4 रिश्टर स्केलची तीव्रता
Delhi Earthquake : दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. दरम्यान या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केलची इतकी होती.
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. 6.4 रिश्टर स्केलची तीव्रता या भूकंपाची होती. तर या भूकंपाचं केंद्र हे नेपाळमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Earthquake of Magnitude 6.4 strikes Nepal: National Center for Seismology
— ANI (@ANI) November 3, 2023
Strong tremours felt in Delhi pic.twitter.com/OjSoA1XVOX
रात्री 11.32 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत होते. लोक जेवल्यानंतर झोपण्याच्या तयारीत असताना हे धक्के बसले. धक्क्यानंतर लोक घराबाहेर पडले. लोक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यामध्ये पंखे, झुंबर आणि दिवे हलताना स्पष्ट दिसत आहे.
माहिती देताना नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 इतकी मोजली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप जमिनीपासून 10 किमी खाली आला आहे.
लोकांनी काय करु नये?
लोकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. घाबरू नका, शांत राहा. टेबलाखाली जा. आपले डोके एका हाताने झाकून ठेवा आणि भूकंप थांबेपर्यंत टेबल धरा. धक्के जाणवलं थांबल्यानंतर लगेच बाहेर पडा.बाहेर पडताना इमारती, झाडे आणि भिंतींपासून दूर राहा. तुम्ही वाहनाच्या आत असल्यास तिथेच थांबा आणि धक्के जाणवेपर्यंत आतमध्येच थांबा.
#Earthquake | An earthquake resistant house 🏡 can help save lives! Watch this to learn more👇 pic.twitter.com/4iaRm88pCq
— NDMA India | राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण 🇮🇳 (@ndmaindia) November 3, 2023
Earthquake of Magnitude:6.4, Occurred on 03-11-2023, 23:32:54 IST, Lat: 28.84 & Long: 82.19, Depth: 10 Km ,Location: Nepal, for more information Download the BhooKamp App https://t.co/SSou5Hs0eO@ndmaindia @Indiametdept @Dr_Mishra1966 @Ravi_MoES @KirenRijiju @PMOIndia pic.twitter.com/XBXjcT29WX
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) November 3, 2023