एक्स्प्लोर

LIVE : श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला

श्रीनगरमधल्या बीएसएफच्या 182 व्या बटालियनच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पहाटे 4.30 च्या सुमारास याठिकाणी 4 ते 5 दहशतवादी शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला.

श्रीनगर : श्रीनगरमधल्या बीएसएफच्या 182 व्या बटालियनच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद, तर 4 जवान जखमी झाले आहेत. आत्मघाती हल्ला करणाऱ्या तीनही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे. पहाटे 4.30 च्या सुमारास याठिकाणी हे तीन दहशतवादी शिरले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं स्विकारली आहे. दरम्यान श्रीनगर विमानतळापासून हा बीएसएफ कॅम्प अगदी जवळ आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर विमानतळ बंद करण्यात आलं होतं.  हल्लेखोर दहशतवादी एका इमारतीत लपले होते, पहाटेपासून दोन्ही बाजूंनी चकमक सुरु होती. आसपासच्या परिसरातील शाळांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुट्टी देण्यात आली. हा हल्ला आत्मघाती असल्याचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दहशतवादी बीएसएफ कॅम्पमध्ये घुसण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्यापैकी तिघांनाही कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे. अशी माहिती बीएसएफकडून देण्यात आली. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये 5 जूनला चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. आजच्या सारखाच पहाटे 4 वाजता या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून लावत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. याच परिसरात 17 वर्षांपूर्वीही 2000 साली असाच हल्ला करण्यात आला होता. स्फोटकांनी भरलेली गाडी विमानतळात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जैश ए मोहम्मदच्या या हल्ल्यात स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा स्फोटही झाला होता. आजचाही हल्ला जैशनंच केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. LIVE UPDATES
  • बीएसएफ कॅम्पमध्ये पुन्हा फायरिंगचा आवाज, लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरु
  • विमानतळ सुरु, प्रवाशांना विमानतळावर जाण्याची परवानगी
  • हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं स्विकारली आहे.
  • श्रीनगरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 वाजता उच्चस्तरीय बैठक

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Jharkhand Protest: झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन अखेर 24 दिवसांनी मिटलं; भाजपने काँग्रेस-इंडिया आघाडीला कसं कोंडीत पकडलं अन् राहुल गांधींच्या पत्रानंतर परिस्थिती कशी बदलली? वाचा इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget