एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोदींनी मला दिलेला सल्ला स्वत: अंमलात आणावा : मनमोहन सिंह
भाजप नेते तुमचा उल्लेख कायम 'मौनमोहन सिंह' असा करत असत, यावर तुम्ही काय म्हणाल असं विचारलं असता, ते म्हणाले की, "या प्रकारच्या टिप्पणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील.
नवी दिल्ली : उन्नाव आणि कठुआ गँगरेप प्रकरणी अनेक दिवस मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी निशाणा साधला आहे. "मोदी जो सल्ला मला देत असत, आता त्यांनी त्याच सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी," असं मनमोहन सिंह म्हणाले.
'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोंदीवर टीका करताना मनमोहन सिंह म्हणाले की, "मला आनंद आहे की मोदींनी अखेर या प्रकरणांवर मौन सोडलं. भारताच्या मुलींना न्याय मिळेल आणि दोषींना सोडणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. पण मोदी मला जो सल्ला देत असत, तो त्यांनी स्वत: फॉलो करायला हवा आणि अधिक बोलायलं हवं."
भाजप नेते तुमचा उल्लेख कायम 'मौनमोहन सिंह' असा करत असत, यावर तुम्ही काय म्हणाल असं विचारलं असता, ते म्हणाले की, "या प्रकारच्या टिप्पणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पण मला वाटतं की, नरेंद्र मोदी मला कायम बोलण्याचा सल्ला देत असत, आता त्यांनी त्या सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी. माझ्या न बोलण्यावर ते कायम टीका करत होते, हे मला मीडियातून कळलं. पण जो सल्ला ते मला देत होते, त्यावर त्यांनी स्वत: अंमबजावणी करायला हवी."
"दोन्ही प्रकरणांवर उशिरा भाष्य केल्याने दोषी वाचू शकतात अशी नागरिकांची भावना झाली होती. जे सत्तेत आहेत, त्यावर त्यांनी त्याचवेळी बोलायलं हवं, असं मला वाटतं," असं मनमोहन सिंह यांनी सांगितलं.
2012 मध्ये यूपीए सरकारच्या कार्यकाळात दिल्ली गँगरेपच्या वेळी भाजपने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर सडकून टीका केली होती. मनमोहन सिंह यांच्या मौनावर भाजप टीका करण्याची संधी कधीही सोडत नसे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement