अचानक लॉकडाऊन घेतल्याने लोकांवर शेकडो किलोमीटर पायपीट करण्याची वेळ; सोनिया गांधींची टीका
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी तयारी न करता लॉकडाऊन घेतल्याने लोकांचे हाल झाल्याची टीका सोनिया यांनी मोदी सरकारवर केली.
नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर देशातील अनेक राज्यांमध्ये कामगार आपल्या कुटुंबासह पायी प्रवास करताना पाहायला मिळाले. अजूनही काहींचा प्रवास सुरुच आहे. काहीही सूचना देता लॉकडाऊन जाहीर केल्याने असंख्य लोकांवर उपासमारीची वेळ आहे. याला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी केला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचा समावेश होता.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले हे योग्यचं आहे. मात्र, काही तासांच्या सूचनेनंतर लगेच अमलबजावणी केल्याने सर्वसामान्य माणूस यामुळे संकटात सापडला आहे. सार्वजनिक वाहतूक अचानक बंद केल्याने कोट्यवधी कामगार घरी जाऊ शकले नाही. परिणामी अनेकजण आता शकडो किलोमीटर पायी घरी जाताना दिसत आहे. यावरुन लॉकडाऊन करण्यासाआधी तयारी केली नसल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली. असंख्य कामगार या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर आले आहेत. तर, शेतकऱ्यांच्या शेतातील माल शेतातचं वाया जात आहे. लॉकडाऊनमुळे शेतात मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आल्याचे सोनिया म्हणाल्या.
हॉस्पिटल क्वॉरन्टाईन होण्यापेक्षा होम क्वॉरन्टाईन होऊन स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करा : अजित पवार
मध्यम व लघु उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करा लॉकडाऊनमुळे आज मध्यम व लघु उद्योगांसंबंधी कोट्यवधी लोकांच्या रोजगारार बुडाला आहे. त्यामुळे छोटे व्यापारीही रस्त्यावर आला आहे. यामुळे यांच्यासाठी सरकारने पॅकेजची घोषणा करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली. देशात असंघटीत कामगारांचे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे. या लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. या लोकांना किमान वेतन सरकारने दिले पाहिजे. अन्यथा ही लोकं रस्त्याावर येतील. तसेच कोरोना संकटाशी लढणारे डॉक्टर, परिचारिका इत्यादींना युद्धस्तरावर सुरक्षेच्या साहित्य पुरवले पाहिजे. अनेक रुग्णालयात सध्या व्हेंटिलेटर आणि इतर साहित्यांची कमतरता जाणवत आहे. अशा ठिकाणी ती व्यवस्था करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली.
काँग्रेसशासित राज्यांना सूचना काँग्रेसशासित राज्यांतील नेते मंडळीने पुढाकार घेऊन अशा लोकांना मदत करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी केलं. ज्या लोकांचा सध्या रोजगार गेलाय अशांसाठी राहण्याची आणि खाण्याची सोय तात्काळ करण्याच्याही सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या. कोणताही रोग धर्म, जात, स्त्री, पुरुष पाहत नाही. त्यामुळे असा कोणताही भेदभाव न करता आपापल्या राज्यात काम करावे आणि सर्वांची काळजी घ्यावी, असं सोनिया यांनी स्पष्ट केलं.
Attack on Doctors | तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या पथकावर इंदूरमध्ये दगडफेक | ABP Majha