एक्स्प्लोर

Soli Sorabjee Death: माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन

प्रख्यात वकील  आणि देशाचे माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी (Soli Sorabjee) यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. सोली सोराबजी हे 1989 ते 1990 आणि 1998 ते 2004 या काळात देशाचे अटॉर्नी जनरल होते.

नवी दिल्ली: प्रख्यात वकील, देशाचे माजी अटॉर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 91 वर्षाचे होते. सोली सोराबजी यांची ओळख एक तत्वनिष्ठ आणि मधुर व्यक्तीमत्व अशी होती. त्याच्या निधनावर देशातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

सोली सोराबजी यांचं पूर्ण नाव सोली जहांगीर सोराबजी असं आहे. त्यांचा जन्म 1930 साली मुंबईमध्ये झाला. 1953 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिसला सुरुवात केली. सोली सोराबजी 1971 साली सर्वोच्च न्यायालयात सीनियर काऊन्सलिंग झाले. सोली सोराबजी हे 1989 ते 1990 या काळात देशाचे अटॉर्नी जनरल होते. त्यानंतर पुन्हा एकदा 1998 ते 2004 या काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. 

सोली सोराबजी यांची ओळख देशातील एक प्रख्यात वकील अशी होती. त्यांची गणना जगातील मोठ्या मानवाधिकार वकिलांच्या यादीतही होत होती. नायजेरिया देशातील मानवाधिकाराच्या उल्लंघनाबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्राने 1997 साली विशेष दूत म्हणून पाठवलं होतं. 

सोली सोराबजी यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारच्या वतीनं त्यांचा पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
जतर मंतरवरुन दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलल्यानंतरही सोनम वांगचुक यांचा निर्धार कायम; रुग्णालयात औषधे आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार
जतर मंतरवरुन दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलल्यानंतरही सोनम वांगचुक यांचा निर्धार कायम; रुग्णालयात औषधे आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
Crime News: सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget