Coronavirus Updates: देशात कोरोना रुग्णसंख्येचा विक्रम, गेल्या 24 तासात 3.86 लाख नव्या रुग्णांची भर तर 3498 जणांचा मृत्यू
Corona Daily Cases: देशात गेल्या 24 तासात 3.86 लाख नव्या रुग्णांची भर पडली असून ही संख्या देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात जास्त आहे. तसेच मृत्यूची सर्वाधिक नोंद झाली असून गेल्या 24 तासात 3498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली: भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. गेल्या 24 तासात देशात 3,86,452 नव्या रुग्णांची भर पडली असून 3498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या आहे. गेल्या 24 तासात 2,97,540 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी देशात 3.79 लाख नव्या रुग्णांची भर पडली होती.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 87 लाख 62 हजार 976
- एकूण मृत्यू : 2 लाख 8 हजार 330
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 53 लाख 84 हजार 418
- एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 31 लाख 70 हजार 228
- देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 22 लाख 45 हजार 179 डोस
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
मागील काही दिवसांपासून राज्यात सातत्याने 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यात गुरुवारी तब्बल 66 हजार 159 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. दिलासादायक म्हणजे गुरुवारी एकाच दिवसात 68 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 37,99,266 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. राज्यात एकूण 6,70,301 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे.
कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, तरीही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. परिणामी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. ऑक्सिजन, औषधे, इंजेक्शन यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू
देशाची राजधानी दिल्लीमध्ये सर्वाधिक मृत्यू होत असून गुरुवारी एकाच दिवसात 395 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 24,225 नव्या रुग्णांची बर पडली असून 25,615 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
महत्वाच्या बातम्या :