Adar Poonawalla: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पूनावाला  (Adar Poonawalla ) यांनी लसींचं जागतिक प्रमाणीकरण व्हावं असं आग्रही आवाहन केलंय.  संयुक्त राष्ट्र आणि जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) सारख्या बहुपक्षीय संस्थांनी कोणत्याही महामारीच्या आधी लसींच्या प्रमाणीकरणावर समन्वय साधण्याची गरज आहे, असे पूनावाला यांनी म्हटले आहे. सिंगापूर येथे सोमवारी फोर्ब्स ग्लोबल सीईओ परिषदेत पूनावाला यांनी हे स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणत्याही साथीच्या रोगावेळी लसींच्या जागतिक प्रमाणीकरणाची आवश्यकता आसल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे.     


"युनायटेड नेशन्स आणि डब्ल्यूटीओ सारख्या बहुपक्षीय संस्थांनी लसींचे प्रमाणीकरण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, " असे पूनावाल यांनी ग्लोबल सीईओ परिषदेत सांगितले. कोरोना महामारीनंतर जभरातील अनेक तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर पूनावाला यांनी  लसींच्या जागतिक प्रमाणीकरणासाठी आग्रही आवाहन केलंय. पूनावाला यांनी यावेळी लसींच्या पुरवठ्यातील अडथळ्यांचा उल्लेख केला.  कोरोना महामारीच्या सुरूवाच्या काळात लस प्रमाणपत्रे आणि क्लिनिकल चाचणी कागदपत्रे स्वीकारली जात नव्हती. त्यामुळे येणाऱ्या काळात लसींच्या जागतिक प्रमाणीकरणाची गरज असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे.   


लसींच्या जागतिक प्रमाणीकरणासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व करण्यात भारत आपली भूमिका बजावेल याची मला खात्री आहे, असा विश्वास देखील यावेळी पूनावाला यांनी व्यक्त केला. भारतातील आरोग्य विमा व्यवसायात प्रवेश करण्यासाठी ते जागतिक भागीदारीच्या शोधात असल्याचेही यावेळी पूनावाला यांनी सांगितले.  


भारतात एक ब्रँड आणण्यासाठी जागतिक समूहासोबत भागीदारी शोधत आहोत.  ही भागीदारी जनतेसाठी आरोग्य विम्याच्या वाढीस मदत करू शकेल, अशी माहिती पूनावाला यांनी दिलीय.  पूनावाला यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय भागीदारीद्वारे भारतात आरोग्य विमा व्यवसाय वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.  SII ने विमा व्यवसायाच्या वाढीसाठी   10,000 कोटी रूपयांची गेल्या दोन वर्षात  गुंतवले आहेत. गेल्या पाच दशकात US$ 18,44,229 ची गुंतवणूक केल्याची माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या


Cervical cancer vaccine : गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत 200 ते 400 रुपये असण्याची शक्यता : अदर पुनावाला


Covid Vaccine : कोरोना लशीमुळे मृत्यू; बिल गेट्स आणि अदार पूनावाला यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस