Horoscope Today 15 July 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 15 जुलै 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज काही ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कोणती गुंतवणूक करू नये, शूर बनाल, त्यामुळे थोडी निश्चय भूमिका ठेवा
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो नोकरीमध्ये वरिष्ठांसमोर तुमची बाजू स्पष्टपणे मांडायला हवी, योग्य औषधोपचारामुळे तुमची कार्यक्षमता वाढू शकते
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज व्यवसायात नवीन योजना साकार करण्यासाठी भांडवलाची गरज भासेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज घरामध्ये मी म्हणेन ते प्रमाण अशी कृती ठेवली, तर विरोध होईल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून अभ्यासाला लागायला हवे, स्वतःच्याच कोशात जास्त वावराल .
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज इतरांच्या स्वभावाचा अंदाज आज नीटसा येणार नाही, आज तुम्ही इतरांपेक्षा वेगळे वाटाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील आनंदी वृत्ती इतरांना सुखावून जाईल, वाचन लिखाण करायला सवड मिळेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रवासाची हाऊस भागवून घ्याल, निसर्गाच्या सानिध्यात सहल काढायचे बेत ठरतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना मदत करायला सरसावाल, कवि लेखकांना उत्स्फूर्त साहित्य सुचेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो तुमच्या विरुद्ध कोणी बोलले तर रागाचा पारा ताबडतोब चढेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज अस्थिर मनवृद्धीमुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांनी आज जोडीदार शोधण्याची मोहीम हाती घ्यायला हरकत नाही.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Sign: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात 'बुधादित्य राजयोग' बनतोय, ‘या’ 5 राशींची चांदीच चांदी! तुमची रास कोणती?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)