Washim : वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील अंबापूर गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेजारील गावातील काही जणांनी आत्महत्या केलेल्या मुलीवर गेल्या काही आठवड्यांपासून माझ्यावर फोनवर बोल असा सतत दबाव आणणे सुरू केले होते. त्यामुळेच घाबरलेल्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेट 'तू आमच्याशी फोनवर बोल, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना व भावाला ठार मारु अशी धमकी सुद्धा देण्यात आली होती. या प्रकरणी मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर तीन जणांविरोधात अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन जणांना अटक, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु
फोन वर बोल अन्यथा कुटुंबाला मारून टाकू, अल्पवयीन मुलीवर असा दबाव टाकल्यामुळे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आतिश चवरे, अमोल टोणे यांना अटक केली असून या प्रकरणी एक अनोळखी व्यक्ती फरार असून पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
गेल्या सहा महिन्यापासून मुलीला धमकी देऊन दबाव टाकत होते
गेल्या सहा महिन्यापासून पीडित मृतक युवतीला फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकत धमकी देत होते. आरोपींनी 'तू आमच्याशी फोनवर बोल, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना व भावाला ठार मारू,' अशी धमकी देत पीडित मुलीच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने दोन दिवसा पूर्वी आत्महत्या केली आहे. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करत आहे..वाशिम जिल्ह्यातील गेल्या महिन्या भरात ही दुसरी घटना असून महिला मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. दरम्यान, या घटनेनं वाशीम शह हादरलं आहे. धमकीला घाबरुन मुलीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आतिश चवरे, अमोल टोणे यांना अटक केली आहे. तसेच एका अनोळखी आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
Belgaum Crime News: बेळगावात मन सुन्न करणारी घटना, कुटुंबाने एकत्रच जीवन संपवण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं, सगळ्यांनी विष प्यायलं पण