Cervical cancer vaccine : सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) गर्भाशयाच्या कर्करोगावर (Cervical Cancer) पहिली स्वदेशी लस तयार केली आहे. आज ही लस लॉन्च करण्यात येणार आहे. कर्करोगासारख्या घातक आजारावर ही लस येत असल्यानं हा सर्वांनाचं दिलासा म्हणावा लागेल. दरम्यान, या लसीची किंमत किती असणार याबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief executive officer) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी माहिती दिली आहे. गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत ही 200 ते 400 रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, अद्याप किंमत निश्चित केली नसल्याची माहिती पुनावाला यांनी दिली आहे.


सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगावरील पहिल्या स्वदेशी लस तयार केली आहे. या लशीची नेमकी किंमत किती असणार याबाबत चर्चा सुरु होती. यावर अदर पुनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या लसीची किंमत 200 ते 400 रुपये असू शकते. ही लस प्रथम आपल्या देशाला देण्यात येणार आहे. त्यानंतर जगातील इतर देशांना देण्यात येणार असल्याची माहिती देखील अदर पुनावाला यांनी दिली. 2 वर्षांत 200 दशलक्ष डोस तयार करण्याची तयारी असल्याचेही पुनावाला यांनी म्हटले आहे.


 






आज लस लाँच करणार 


स्वदेशी विकसित देशातील पहिली क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमावायरस वॅक्सीन (qHPV) गुरुवारी म्हणजेच, आज लाँच केली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभागानं 1 सप्टेंबर रोजी गर्भाशयाच्या कर्करोगावरील उपचारासाठी स्वदेशी लस विकसित करण्याची योजना आखली. विशेष म्हणजे, सीरम इन्स्टिट्यूटच्या qHPV लसीला DCGI कडून 12 जुलै रोजी मार्केट ऑथरायझेशन मिळालं होतं. सध्या या आजारावरील प्रभावी लस भारत सध्या परदेशातून आयात करतो. त्यामुळे त्यासाठी जास्त खर्च येतो. आता ही लस देशातच उपलब्ध झाल्यामुळे लसीवरील खर्च कमी होऊन रुग्णांना अगदी सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: