(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवालाच्या स्मरणार्थ हरियाणामध्ये स्मारक उभारणार
प्रताप सिंह बाजवा (Pratap Singh Bajwa) यांनी मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांच्याकडे सिद्धू मुसेवाला प्रकरणी CBI चौकशीची मागणी केली आहे.
Sidhu Moose Wala Murder Case: पंजाबी गायक-राजकारणी सिद्धू मुसेवाला यांची रविवारी (29 मे) पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहर गावाजवळ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या स्मरणार्थ हरियाणामध्ये (Haryana) स्मारक उभारण्यात येणार आहे. जेजेपी नेता दिग्विजय चौटाला (Digvijay Chautala) यांनी रविवारी सांगितले की, हरियाणाच्या मंडे डबवाली येथे सिद्धू मुसेवालाच्या नावावर स्मारक बनवण्यात येणार आहे.
दिग्विजय चौटाला म्हणाले, सिद्धू मुसेवालाच्या नावावर संगीत शाळा तसेच पार्कचे नाव ठेवण्यात येणार आहे. तसेच 8 तारखेनंतर मुसेवाला यांचे कुटुंब हरियाणा सरकारकडे तक्रार करणार आहे. त्यानंतर हरियाणा सरकार या प्रकरणाचा तपास करणार आहेत. मुसेवाला प्रकरणी अनेक संशयिताचे नाव हरियाणाशी जोडलेले आहेत. हरियाणा या प्रकरणी चौकशी करणार आहे. सीबीआय चौकशीची गरज पडल्यास हरियाणा सरकार त्यासाठी देखील तयार आहे.
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांना गोळया मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. मुसेवाला यांना गोळी मारणारे संशयित आरोपी सोनिपतमधील रहिवासी आहेत. प्रियवत फौजी आणि अंकित सेरसा यांची नावं समोर येत आहेत. या दोन्ही आरोपींची एक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. यामध्ये हे दोघे पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरताना दिसत आहेत.
सिद्धूला मारण्याची प्लानिंग लॉरेन्स बिश्नोई या गॅंगस्टरने दिल्लीत बसून केली. दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने जेलमधूनच हा कट काही महिन्यापूर्वीच रचला होता. लॉरेन्स बिश्नोईने तिहार तुरुंग क्रमांक 8 मध्ये बसून पूर्ण प्लान बनवला आणि आपल्या शूटरला सिद्धूला मारण्याची सुपारी दिली.
गायक सिद्धू मुसेवालांवर ऑटोमॅटिक असॉल्ट रायफलने 30 गोळ्या झाडण्यात आल्या. मुसेवाला यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. लॉरेन्स बिश्नोई दिल्ली विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. लॉरेन्सच्या वकिलाने मुसेवाला प्रकरणात त्याच्या सहभाग नाकारला आहे. दुसरीकडे पंजाबचे पोलीस प्रमुख व्ही. के. भवरा यांनी ही घटना टोळीयुद्धातून झाली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.