एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रायबरेलीत भाजपच्या सभेवेळी शॉर्ट सर्किट, अमित शाह म्हणतात, हे शुभसंकेत
रायबरेलीतील भाजपच्या सभेच्या व्यासपीठामागील बॅनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा फोटो गायब होता. बॅनरवर मोदींचा फोटो न छापल्याने उपस्थितांमध्ये आणि नंतर सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली.
रायबरेली (उत्तर प्रदेश) : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघात म्हणजेच रायबरेलीत भाजपने ‘परिवर्तन संकल्प रॅली’चं आयोजन केलं होतं. अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज भाजप नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी शॉर्ट सर्किटची घटना घडली. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
रायबरेलीतील इंटर कॉलेजच्या मैदानात भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडेय यांचे भाषण सुरु असताना, मीडिया गॅलरीजवळून अचानक धूर आल्याने भाषण 12 मिनिटं थांबवावं लागलं. स्पिकर्सला शॉर्ट सर्किट झाल्याचे समोर आले.
शुभसंकेत
मीडिया गॅलरीजवळ शॉर्ट सर्किटची घटना घडल्यानंतर, भाजपच्या नेत्यांना घाम फुटला. मात्र उपस्थित प्रशासाने तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत, सर्वांनाच दिलासा दिला. सर्व स्थिती पूर्ववत झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवरही मिश्किल भाष्य केले. तर भाजपाध्यक्ष अमित शाह म्हणाले, “जेव्हा कधी चांगलं होत असतं, तेव्हाच अशा अडचणी येतात. ही घटना म्हणजे रायबरेलीत चांगलं काहीतरी होणार आहे.”
व्यासपीठामागील बॅनरवरुन मोदी गायब
रायबरेलीतील भाजपच्या सभेच्या व्यासपीठामागील बॅनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो गायब होता. बॅनरवर मोदींचा फोटो न छापल्याने उपस्थितांमध्ये आणि नंतर सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement