एक्स्प्लोर

सेना गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार, मोर्चेबांधणी सुरु

ऑक्टोबर महिन्यात उद्धव ठाकरे गोव्यात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.

गोवा : विधानसभा निवडणुकीत गोव्यात शिवसेनेचा दारुण पराभव झाला असतानाही, शिवसेनेने गोव्यातून माघार घेतली नाही. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि गोव्याचे शिवसेना प्रभारी संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. ते पणजीत बोलत होते. “गोव्यात शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीचे काम सुरु आहे. शिवसेना सुभाष वेलिंगकर यांना विश्वासात घेऊन गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्या बरोबर गोव्यात प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावेल.”, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. परिमल पंडीत आणि 100 कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना गोव्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आपली भूमिका नीट बजावता येत नसल्याचा आरोप केला. शिवसेना गोव्यातील लोकांना भेडसावणारे विषय घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. गोव्यात आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने इथल्या लोकांना अनेकदा उपचारासाठी मुंबई, बेळगाव किंवा इतर शहरात जावे लागत असल्याचे सांगून राऊत म्हणाले, “शिवसेना गोव्यात फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका देऊन सामाजिक बांधीलकी जोपासणार आहे.” शिवाय, नवरात्री दरम्यान आरोग्य शिबिरे घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात उद्धव ठाकरे गोव्यात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली. पणजी पोटनिवडणुकीत भाजपच्या मनोहर पर्रिकर यांना कमी मताधिक्य मिळाले असल्याने ही बाब आश्चर्यकारक असल्याचे राऊत म्हणाले. भाजप सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असून असल्या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget