एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेना खासदार रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला
शिवसेना खासदार आणि पियुष गोयल यांच्यात रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत चर्चा झाली.
नवी दिल्ली: रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मुंबईत केलेल्या रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.
खासदार आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, चंद्रकांत खैरे, श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य सेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली.
यावेळी शिवसेना आणि पियुष गोयल यांच्यात रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. अॅप्रेंटिस उमेदवारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी शिवसेना खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली.
अॅप्रेंटिस उमेदवारांचं आंदोलन
तब्बल साडेतीन तास मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर, अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको मागे घेतला आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं.
सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली.
सकाळी सात वाजल्यापासून सुरु असलेलं आंदोलन साडेतीन तासांनी मागे घेण्यात आलं. येत्या दोन ते तीन दिवसात मागण्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन रेल्वेकडून अॅप्रेंटिसच्या उमेदवारांना देण्यात आलं. त्यानंतर आंदोलक ट्रॅकवरुन हटले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement