एक्स्प्लोर
एवढ्या सभा घेता, पैसा कुठून येतो? शिवसेनेचा मोदींना बोचरा सवाल
‘भाजपच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक पडला आहे. भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत भाजप गंभीर नाही,’ असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.

फाईल फोटो
मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी एवढ्या सभा घेतात, त्यासाठी पैसा कुठून येतो?’ असा प्रश्न विचारत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपला कोंडीत पकडलं. ‘मोदींच्या सभांवर सरकार खर्च करतं की भाजप?’ असा सवालही सावंतांनी केला.
‘भ्रष्टाचार निर्मुलनावर बोलणं सोपं आहे, पण भ्रष्टाचार हटवण्यासाठी प्रयत्न करणं अवघड आहे,’ असं म्हणत अरविंद सावंतांनी भाजपवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचार निर्मुलन संशोधन विधेयकावर संसदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अरविंद सावंतांनी ही टीका केली.
‘भाजपच्या बोलण्यात आणि कृतीत मोठा फरक पडला आहे. भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत भाजप गंभीर नाही,’ असा आरोपही सावंत यांनी केला.
पंतप्रधानांना आव्हान
ज्याप्रमाणे इतर खासदारांसाठी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू असते, तशी आचारसंहिता पंतप्रधानांसाठीही लागू असावी, अशी मागणी अरविंद सावंतांनी केली.
पंतप्रधान मोदींनीही सर्वसामान्य खासदारांप्रमाणेच निवडणूक मोहिम राबवून दाखवावी, असं आव्हानही सावंत यांनी पंतप्रधानांना दिलं.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिवसेना सरकारवर अधिकाधिक कठोर टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
