एक्स्प्लोर
शिवसेना काँग्रेसचं पहिलं एकत्रित आंदोलन? शिवसेना खासदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट
शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष पहिल्यांदाच एकत्र आंदोलन करण्याची शक्यता आहे. आज नवी दिल्लीत शिवसेना खासदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीपासून विविध चर्चांना उधाण आले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून एकमेकांचे शत्रू असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा होता. त्यासाठी सर्वप्रथम शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. लोकसभेत, राज्यसभेतही शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे. शिवसेना महाराष्ट्राप्रमाणे केंद्रातही काँग्रेसच्या जवळ जात असल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. उद्या (26 नोव्हेंबर) संविधान दिनानिमित्त काँग्रेस संसदेत एक आंदोलन करणार आहे. काँग्रेसच्या या आंदोलनात शिवसेनादेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात शिवसेनेच्या चार खासदारांनी आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस नेते आणि संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या भेटीचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार अनिल देसाई आणि खासदार राहुल शेवाळे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. शिवसेनेसोबतची सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेसच्या मनात काही शंका होत्या. या भेटीत शिवसेना नेत्यांनी त्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापण्यामध्ये भाजपाने जी घटनाबाह्य कृती करून संविधानाचा अवमान केलेला आहे त्याचा निषेध. pic.twitter.com/VwFXHp4KDB
— Gajanan Kirtikar -गजानन कीर्तिकर (@GajananKirtikar) November 25, 2019
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























