एक्स्प्लोर

शशीकला नटराजन तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री?

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी AIADMK पक्षाच्या सरचिटणीस शशीकला नटराजन लवकरच विराजमान होण्याची शक्यता आहे. शशीकला या सध्या AIADMK पक्षाच्या सरचिटणीस आहेत. उद्या (5 फेब्रुवारी) चेन्नईत होणाऱ्या बैठकीत AIADMK चे आमदार शशीकला यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती करणार आहेत, असे बोललं जात आहे. AIADMK पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, पनीरसेल्वम यांची जागा शशीकला घेतील, हे फक्त तर्क आहेत. अद्याप कोणतीही ठाम भूमिका जाहीर केलेली नाही. गेल्या महिन्यात वरिष्ठ नेते तंबीदुराई म्हणाले होते की, पक्षाचे सर्वेसर्वा आणि सरकारमधील सर्वेसर्वा एकच व्यक्ती असायला हवी. त्यामुळे सध्या पक्षाची संपूर्ण जबाबदारी शशीकला यांच्यावर आली असल्याने त्याच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असतील, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. शशीकला नटराजन यांची AIADMK पक्षाच्या सरचिटणीसपदी 29 डिसेंबरला निवड करण्यात आली होती. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होईल असा जाणकारांनी अंदाज वर्तविला होता. जयललिता यांच्या निधनानंतर पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आता त्यांना या पदावरुन पायउतार व्हावं लागण्याची शक्यता आहे. जयललितांच्या सावलीसारखी वावरणारी शशीकला कोण? शशीकला नटराजन….जयललितांच्या आयुष्यातली एक रहस्यमय व्यक्ती…या दोघींचं नातं काय होतं हे कुणीच ठाम सांगू शकत नाही…कुणी परममैत्रिण सांगतं, कुणी मानलेल्या बहिणीसारखं सांगतं…तर कुणी…लिव्ह इन कम्पॅनियनही… पण एक आहे की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची तिला माहिती असायची… आजवर पडद्याआड वावरणारी शशीकला आता पहिल्यांदाच जाहीरपणे समोर येण्याची शक्यता आहे. कारण जयललितांच्या निधनानंतर तिच्याकडेच पक्षाची धुरा जाण्याची शक्यता आहे. शशीकला आणि जयललितांची ओळख कशी? 1970 च्या सुमारास शशीकला आणि जयललितांची पहिली भेट झाली. शशीकला नटराजन हिचा पती पीआरओ म्हणून काम करत होता. आणि तो ज्या आयएएस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करत होता, तो जयललितांच्या जवळ होता. एका व्हिडिओ शुटिंगच्या निमित्ताने झालेल्या या पहिल्याच भेटीत शशीकलानं जयललितांना जिंकलं. त्यानंतर लवकरच ती जयललितांच्या आयुष्यात एक महत्वाची व्यक्ती बनली. एमजी रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशीकलाचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. जयललिता तिला आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. त्यावेळी शशीकलानं आपल्या मन्नारगुडी गावातल्या 30-35 लोकांची टीम बंगल्यावर तैनात केली. स्वयंपाकी, वॉचमन, मदतनीस, ड्रायव्हर असे सगळे तिच्या गोटातले….एक प्रकारे हे जयललितांच्या भोवती एक जाळं विणल्यासारखंच होतं. जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या 1991 साली….पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. या पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा अधिक झाली. असं म्हणतात की याला सगळ्यात जास्त कारणीभूत होती शशीकला. शशीकलाच्या कुटुंबातले लोक प्रत्येक सरकारी कामात दलाली खात असल्याचे आरोप झाले. सुब्रमण्यम स्वामी हे तर शशीकलाच्या या गोत्याचा उल्लेख मन्नारगुडी माफिया असाच करायचे. शिवाय 1995 साली शशीकलानं आपला भाचा सुधाकरन जयललिलांना दत्तकपुत्र म्हणून दिला. सुधाकरनचं लग्न इतक्या थाटात पार पडलं की संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनानं जयललितांची इमेज निगेटीव्ह बनत चालली. बेनामी संपत्तीच्या केसेसमध्येही जयललिता-शशीकला या दोघींवर एकत्र आरोप झाले. शशीकलाची संगत चांगली नाही असा सल्ला अनेकांनी दिल्यावर जयललितांनी डिसेंबर 2011 मध्ये तिला दूरही केलं. तिच्या नातेवाईकांनाही बंगल्यातून हाकललं. पण हा राग 100 दिवसही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशीकलाचा कळवळा आला, आणि त्यांनी तिला माघारी बोलावलं. आता शेवटच्या श्वासापर्यंत शशीकला त्यांच्यासोबतच राहिली. जयललिता आजारी पडल्यापासूनच सगळ्यांना माहिती होतं की भविष्यात सगळा कारभार शशीकलाकडेच असणार…फक्त ती किंगमेकरची भूमिका पसंत करणार की स्वतःच किंग बनायला सरसावणार इतकाच प्रश्न होता. तूर्तास तरी तिनं पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली आहे. पण पनीरसेल्वम आणि शशीकला यांचे संबंध तितकेसे मधुर नाहीत. शिवाय जो करिष्मा, लोकप्रियता, लोकल टच जयललितांचा होता, तितका शशीकलाचा नाही. त्यामुळे ती किती घट्टपणे पक्षावर आपली कमांड ठेवू शकणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. शशीकला पुष्पा नावाची आणखी एक डीएमके खासदार आहे. तिच्यासोबत नुकतंच भांडण झालेलं आणि तिला हाकलून दिलं होतं. मात्र त्या शशीकलाचा याच्याशी काहीही संबंध नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Hema Malini On CJP Protest: 'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींनी CJP च्या आंदोलनाला म्हटलं निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींच्या मते CJP प्रोटेस्ट निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Embed widget