Share Market Crash : शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'; एकाच दिवसात तब्बल 9 लाख कोटी रुपयांचा चुराडा
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला असून BSE Sensex मधील बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, ॲक्सिस बॅंक आणि टाटा स्टीलसह सर्वच स्टॉकमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.
मुंबई : देशातील ओमायक्रॉनच्या भीतीने सलग दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर मार्केटमध्ये 'ब्लॅक मंडे'चा अनुभव आला असून एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रुपयांचा चुराडा झालं आहे. सेंसेक्समध्ये तब्बल 1189 अंकांची म्हणजे 2.09 टक्क्यांची घसरण झाली आहे तर निफ्टीमध्येही 371 अंकांची म्हणजे 2.18 टक्क्यांची घसरण झाली आहे. जगभरातल्या विविध शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या घसरणीचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवरही झाल्याचं दिसून आलं आहे.
BSE Sensex मधील बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, ॲक्सिस बॅंक आणि टाटा स्टीलसह सर्वच स्टॉकमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. सोमवारी झालेली घसरण ही एप्रिल 2021 नंतर शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांच्या 25 लाख कोटी रुपयांचे काढून घेण्यात आले आहेत.
आज सकाळी मार्केट सुरु होताच मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. सुरुवातीच्या घसरणीनंतर काही वेळेत बाजार सावरेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, घसरणीचे सत्र सुरुच राहिलं. आज दुपारी दोन वाजेपर्यंत शेअर बाजारात 1434.73 अंकांची घसरण झाली होती. सेन्सेक्स 55,577.01 अंकावर ट्रेड करत होता. तर, निफ्टीमध्ये 454 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी 16536.15 अंकावर ट्रे़ड करत होता. निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. निफ्टी 500 अंकाखाली घसरला होता. निफ्टीने 16500 चा स्तरही तोडला होता. मात्र, काही वेळेनंतर पुन्हा सावरला.
बँक निफ्टीत मोठी घसरण दिसून आली. बँक निफ्टीत मोठी विक्री झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत बँक निफ्टी 1407.20 अंकांनी घसरला होता. बँक निफ्टी 34,227 अंकावर ट्रेड करत होता. बँक निफ्टीतील सर्वच स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील शेअर मार्केटमध्ये पैसेकाढून घेण्याचाच कल दिसून येत आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
सीपला- 4 टक्के
फ्युचर ग्रुप स्टॉक्स- 20 टक्के
पेन्नार इंडस्ट्रीज- 20 टक्के
हिंदुस्थान युनिलिव्हर- 1.74 टक्के
डॉ. रेड्डीज् लॅब- 0.95 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
अॅक्सिस बँक- 2 टक्के
आयशर मोटर्स- 2 टक्के
इंडियाबुल्स रीअल इस्टेट- 6 टक्के
टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज- 6 टक्के
आरबीएल बँक- 6 टक्के
आयरकॉन इंटरनॅशनल- 1 टक्के
आयआरबी- 2 टक्के
BPCL- 6.42 टक्के
टाटा स्टील- 5.22 टक्के
Tata Motors- 4.92 टक्के
SBI- 3.98
संबंधित बातम्या :