एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोटाबंदीच्या निर्णयानं देशाची अर्थव्यवस्था दगावली: शरद पवार
बारामती: 'नोटाबंदीचा निर्णयानंतर देशाची अर्थव्यवस्था दगावल्याची परिस्थिती आहे.' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केला आहे. बारामतीत झालेल्या बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या वेळी ते बोलत होते.
'नोटाबंदी नंतर आता संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था दगावल्याची परिस्थितीची आहे. पन्नास दिवस होत आले पण परिस्थिती अजूनही तशीच आहे. ही परिस्थिती अजून काही महिने अशीच राहील असं वाटतं.' असं पवार म्हणाले.
नोटाबंदीमुळं सर्वात जास्त फटका कृषी क्षेत्राला बसल्याची टीका शरद पवारांनी केली. तसंच केंद्र सरकारनं सहकार क्षेत्र उद्धवस्त करायला घेतल्याचा आरोपही शरद पवारांनी केला. बाल वैज्ञानिक प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय विज्ञान मंत्री हर्षवर्धन आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement