एक्स्प्लोर

पवारांच्या घरी विरोधकांची बैठक, सुमारे तासभर खलबतं

बजेट अधिवेशनाच्या सुरुवातीला काही मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती असं पटेल यांनी सांगितलं असलं तरी 2019 साठी भाजपविरोधात महामोर्चा उभा करण्याच्या दिशेनं पावलं पडायला सुरुवात झालीय का, अशी चर्चा यानिमित्तानं सुरु झालीय.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रपतींचं अभिभाषण, सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल असे सगळे सोपस्कार या पहिल्या दिवशी पार पडले. पण राजकीयदृष्टया सगळ्यात महत्वाची घडामोड घडली ती ‘6 जनपथ’ या शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी. देशातल्या अनेक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांची ही खलबतं ही जवळपास तासभर सुरु होती. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, नॅशनल काँन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, जेडीयूतून नुकतेच बाहेर पडलेले शरद यादव, माकपचे टी के रंगराजन, भाकपचे डी राजा यासह राष्ट्रवादीचे प्रमुख राष्ट्रीय नेते या बैठकीला उपस्थित होते. मुंबईत नुकतीच जी ‘संविधान बचाव’ रॅली पार पडली, त्याचा पुढचा टप्पा म्हणून या बैठकीकडे पाहिलं जातंय. या बैठकीनंतर पुढच्या आठवड्यातच काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षांची अजून एक बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय. बजेट अधिवेशनाच्या सुरुवातीला काही मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती असं पटेल यांनी सांगितलं असलं तरी 2019 साठी भाजपविरोधात महामोर्चा उभा करण्याच्या दिशेनं पावलं पडायला सुरुवात झालीय का, अशी चर्चा यानिमित्तानं सुरु झालीय. आजच्या या बैठकीला सपा, बसपा, राजद आणि तृणमूल काँग्रेस यांची हजेरी नव्हती. मात्र मुंबईतल्या रॅलीला यातल्या सपा, तृणमूल काँग्रेसनं आवर्जून उपस्थिती दर्शवलेली होती. विरोधकांच्या एकीत पवारांच्या पुढाकाराचं काय कारण? एरव्ही दिल्लीत चर्चा मोदी-पवारांच्या मधुर संबंधाची होत असते. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजपविरोधी राहिलेली असली तरी राष्ट्रीय पातळीवर या विरोधाची धार कमी होताना दिसते. असं असताना दिल्लीत विरोधकांच्या एकीसाठी पवारांनी पुढाकार घ्यावी याची खमंग चर्चा सुरु आहे. सोनिया गांधी अॅक्टिव्ह रोलमध्ये दिसणार तर.. विरोधकांची पुढच्या आठवडयातली बैठक ही सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली होतेय, हे आज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी काय करणार या प्रश्नाचं उत्तरही मिळालं. यापुढेही त्या सक्रीय राजकारणात असतील हेच यातून दिसतंय. आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली होती. एरव्ही पवारांची केमिस्ट्री काँग्रेसच्या या नव्या पिढीशी फारशी जुळत नाही. मात्र आज त्यांनी राहुल गांधींना बोलावून त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा सगळ्यांच्या भुवया उंचावणाऱ्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget