नर्सला अश्लील मेसेज पाठवला, मुख्याध्यापकाला धू धू धुतला...!
सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या महिलेला शाळेच्या मुख्याध्यापकाने अश्लील मेसेज पाठवल्याने नर्स आणि गावातील लोकांनी मुख्याध्यापकाला चांगला चोप दिला.

बेळगाव : सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या महिलेला शाळेच्या मुख्याध्यापकाने अश्लील मेसेज पाठवल्याने नर्स आणि गावातील लोकांनी मुख्याध्यापकाला चांगला चोप दिला. अश्लील मेसेज पाठवणारा मुख्याध्यापक कित्तूर तालुक्यातील देगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहे. तर महिला कित्तूर तालुक्यातील बैलुर येथे सरकारी दवाखान्यात नर्स म्हणून सेवा बजावत आहे.
मुख्याध्यापकाने नर्सला अश्लील मेसेज पाठवल्यावर सदर नर्सने ही घटना गावातील लोकांना सांगितली. घटना कळल्यावर संतप्त गावकरी आणि नर्स शाळेकडे गेले. शाळेत जावून ग्रामस्थ आणि नर्सने मुख्याध्यापकाला जाब विचारला. यावेळी नर्स आणि ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला चांगला चोप दिला. यावेळी एका संतप्त ग्रामस्थाने मुख्याध्यापकावर खुर्ची फेकली. यावेळी सुदैवाने दुसऱ्या ग्रामस्थांनी खुर्ची अडवल्याने मुख्याध्यापकाला खुर्ची लागली नाही.यावेळी शाळेत आरडाओरडा आणि गोंधळ सुरू होता.अखेर मुख्याध्यापकाने माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा पडला.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू






















