एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली.
![ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या Senior Journalist Gauri Lankesh Shot Dead At Her Residence In Bengaluru Latest Update ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/05220207/Gauri-Lankesh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बंगळुरुतील राहत्या घराबाहेर त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. 'लंकेश पत्रिका' या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या.
55 वर्षीय गौरी लंकेश बंगळुरुतील राजराजेश्वरी नगरमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास तिघा आरोपींनी त्यांना घराबाहेर बोलावलं. त्यांच्यासोबत झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी गौरी यांच्यावर गोळ्या झाडून पोबारा केला.
मारेकऱ्यांनी गौरी लंकेश यांच्यावर 50 मीटर अंतरावरुन सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली.
https://twitter.com/ANI/status/905102980168302593
कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
गौरी यांच्याविरोधात गेल्यावर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजप खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता.
2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.
2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचीही धारवाडमध्ये राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या या दुसऱ्या हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)