एक्स्प्लोर
वडील चहा विकतात म्हणून शाळेनं अॅडमिशन नाकारलं!

लखनऊ : वडील चहा विक्रेते असल्याने मुलाला चक्क शाळेने अॅडमिशन देण्यास नकार दिला. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये ही घटना घडली. एकीकडे देशातील गरिबांनाही शिक्षण मिळावं, म्हणून सरकार घोषणा करत आहे आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. बागपत या परिसरातील लॉर्ड महावीर अॅकेडमी शाळेत वडील चहा विक्रेता असल्याने मुलाला शाळेत प्रवेश देण्यास नाकारण्यात आलं. विद्यार्थी अरिहंतला सहावी इयत्तेत प्रवेश नाकारला, असा आरोप शाळेवर करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, वडील चहा विक्रेता असल्याने प्रवेश नाकारला असं समोर आलाय. विद्यार्थी अरिहंतने त्याच शाळेत पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तरीही अरिहंतला सहावी इयत्तेत प्रवेश दिला गेला नाही. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करुन चांगल्या शाळेत शिक्षण देऊन काहीतरी बनावं, असं स्वप्न उराशी बाळगून चहा विकून पैसे जमा करणारे वडील मंगत राय या घटनेने दुःखी आहे. या प्रकरणी जिल्हा शिक्षण विभागाने शाळेतील प्राचार्यांना ताकीद दिली आहे. मात्र, शाळेने या प्रकरणावर सूचक मौन धारण केले आहे.
आणखी वाचा























