एक्स्प्लोर

न्यायाधीशांचा पगार वाढवण्यास सरकार विसरलंय का? : सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धुलाई भत्ता देण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही टिप्पणी केली आहे.

नवी दिल्ली : न्यायाधीशांचा पगार वाढवण्यास सरकार विसरलंय का?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर नोकरशाहांपेक्षा न्यायाधीशांचा पगार कमी असल्याचं न्यायालयाने केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिलं. सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धुलाई भत्ता देण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती जे चेलेश्वर यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सॉलिसिटर जनरल पी एस नरसिंहा यांना विचारणा केली की, "सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनाबाबत तुमचं काय मत आहे? सातवा वेतन आयोगच्या शिफारशी लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार ज्या फरकाने वाढला तेवढा न्यायाधीशांचा पगार वाढला नाही." न्यायाधीशांचा पगार वाढवण्याचा प्रस्ताव मार्चमध्येच आणला होता. मात्र तेव्हापासून ही प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. आता संसदेत विधेयक संमत झाल्यावरच न्यायाधीशांच्या वेतनात वाढ होणार असल्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारिश लागू झाल्यानंतर नोकरशाहीमधील केंद्रीय सचिव ही सर्वोच्च रँक आहे. कॅबिनेट सेक्रेटरीला महिन्याला 2.5 लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे अनेक प्रकारचे भत्तेही आहेत. भारताचे सरन्यायाधीश ज्यांचं पद हे कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा मोठं आहे, त्यांना महिन्याला एक लाख रुपये पगार मिळतो. सरन्यायाधीशांच्या पगारात एचआरए आणि इतर भत्त्यांचाही समावेश असतो. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना महिन्याला 90 हजार रुपये पगार मिळतो. तर हायकोर्टाच्या इतर न्यायाधीशांना 80 हजार रुपये पगार मिळतो. नोकरशाहा आणि न्यायाधीशांचा पगारातील फरक - केंद्रीय कॅबिनेट सचिवांना महिन्याला अडीच लाख रुपये पगार - देशाच्या सरन्यायधीशांना महिन्याला एक लाख रुपये पगार - सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना महिन्याला 90 हजार रुपये पगार - उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांना महिन्याला 80 हजार रुपये पगार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget