एक्स्प्लोर

नागपुरातील चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या वसंत दुपारेला फाशीच!

नवी दिल्ली : नागपूरमधील चार वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या वसंत दुपारेची फाशी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. 55 वर्षीय वसंत दुपारेची फाशीसंदर्भातील पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 2014 साली वसंत दुपारेला फाशीची शिक्षा सुनावली होती. तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने आजही कायम ठेवला आहे. 2014 मध्ये कोर्टाने म्हटलं होतं की, “माणुसकीला शरमेनं मान खाली घालायला लावणारा हा गुन्हा समाजाला कलंक आहे. हा गुन्हा निश्चितच रेअरेस्ट ऑफर रेअर श्रेणीतला आहे. यामध्ये फाशीपेक्षा कमी शिक्षा दिली जाऊच शकत नाही.” प्रकरण काय आहे? 2008 साली नागपूरमधील वंसत दुपारे याने शेजारी राहणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवून सोबत नेलं आणि अमानूष बलात्कार केला. यानंतर दगडांनी ठेचून चिमुरडीची त्याने हत्या केली. याच प्रकरणात वसंत दुपारेला कनिष्ठ न्यायालय आणि मुंबई हायकोर्टानेही फाशीचीच शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने वसंत दुपारेची याचिका फेटाळली आणि म्हटलं आहे की, “दोषी वसंत दुपारे हा चिमुरडीचा शेजारी होता. त्यामुळे चिमुरडीने त्याच्यावर विश्वास ठेवणं सहाजिक होतं. वसंत दुपारेने या विश्वासाचीही हत्या केली. स्वत:ची मदत करु न शकणाऱ्या चिमुरडीसोबत वसंत दुपारेने विकृत कृत्य केले.” दोषी वसंत दुपारे हा कोणत्याही मानसिक ताणाखाली किंवा कोणत्याही भावनिक समस्येत नव्हता, त्यामुळे तो असं पुन्हा करणार नाही, असे म्हणू शकत नाही, असेही यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटले. वसंत दुपारेच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, वसंत दुपारेचं वय आता 55 वर्षे आहे. त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिल्यास, तो 75 व्या वर्षी सुटेल आणि त्यावेळी समाजासाठी तो घातक ठरणार नाही. मात्र, सुप्रीम कोर्टाने वसंत दुपारेच्या वकिलांचा हा युक्तीवादही फेटाळला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShaikh Subhan Ali :  शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलनSolapur Sangram Morcha : सोलापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांचा मोर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Embed widget