एक्स्प्लोर
खुशखबर! एसबीआयचं गृह कर्ज स्वस्त, बेस रेटमध्ये कपात
बेस रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्याने आता गृहकर्ज स्वस्त होणार आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नव्या वर्षाच्या मुहूर्तावर खुशखबर दिली आहे. एसबीआयने बेस रेट 8.95 टक्क्यांहून 8.65 टक्के केला आहे. बेस रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्याने आता जुन्या गृहकर्जदारांचं कर्ज स्वस्त होणार आहे.
नव्या म्हणजे एमसीएलआर व्याजदर पद्धतीनुसार, 30 लाख रुपयांपर्यंतच्या घरासाठी एसबीआयचा व्याजदर 8.35 टक्के आहे. तर 30 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या घराच्या किंमतीवर 8.45 टक्के व्याजदर आहे.
1 एप्रिल 2016 पासून सर्व बँका मार्जिनल कॉस्ट लेंडिग रेट म्हणजेच एमसीएलआरवर गृह कर्ज देतात. एसबीआयच्या बेस रेटमध्ये कपात झाल्यामुळे जुने गृहकर्जदार, वाहन कर्जदार आणि वैयक्तिक कर्जदारांना फायदा होईल.
दरम्यान, एसबीआयने 31 मार्च 2018 पर्यंत गृहकर्जावर प्रोसेसिंग फीही माफ केली आहे. बँकेचे नवे कर्ज दर 1 जानेवारी 2018 पासूनच लागू झाले आहेत.
एसबीआयने बीपीएलआरमध्ये 0.30 टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे 80 लाख ग्राहकांना फायदा होईल. एसबीआयने सध्याच्या कर्जदारांसाठी बेस रेट 8.95 टक्क्यांहून 8.65 टक्के आणि बीपीएलआर 13.70 टक्क्यांहून 13.40 टक्के केला आहे. मात्र एमसीएलआरमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. एका वर्षाच्या मुदतीतील कर्जासाठी एमसीएलआर 7.95 टक्के आहे.
''एसबीआयने डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात व्याजदरांचा आढावा घेऊन हा निर्णय जाहीर केला. जवळपास 80 लाख ग्राहक व्याजदराच्या जुन्याच व्यवस्थेमध्ये असून त्यांनी एमसीएलआर व्यवस्था स्वीकारलेली नाही. त्यामुळे जुन्या कर्जदारांना निर्णयाचा फायदा होईल'', असं डिजिटल बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement