एक्स्प्लोर
Advertisement

पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य : नरेंद्र मोदी
कच्छपासून कोहिमा, कारगिल पासून कन्याकुमारीपर्यंत केवळ सरदार पटेल यांच्यामुळेच आपण आपण जाऊ शकतो. सरदार पटेल यांनी संकल्प केला नसता तर देशात एका राज्यातून दुसरीकडे जाण्यासाठी व्हिजा लागला असता, असेही मोदी यावेळी म्हणाले.

गांधीनगर : सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य महान आहे. निराशावादी लोक होते त्यावेळी ते आशेचा किरण होते. पटेल यांच्यात कौटिल्याची कूटनीती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य होते, अशा शब्दात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा गौरव केला. भारताचा अभिमान ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळ्याचं मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, धरतीपासून आकाशपर्यंत सरदार यांचा अभिषेक होतोय. आपल्यासाठी पटेल हे गगनचुंबी प्रेरणास्रोत आहेत. मुख्यमंत्री असताना शिलान्यास केला तेव्हा माझ्याच हस्ते लोकार्पण होणार याचा अंदाज नव्हता. हे भाग्य मला लाभणे हा वल्लभभाई पटेल यांचा आशीर्वाद मानतो, असे ते म्हणाले.
या पुतळ्यासाठी देशभरात लाखो गावातून शेतकऱ्यांनी माती आणि जुनी अवजारे दिले त्यांचे आभार मानतो असे मोदी म्हणाले. कच्छपासून कोहिमा, कारगिल पासून कन्याकुमारीपर्यंत केवळ सरदार पटेल यांच्यामुळेच आपण आपण जाऊ शकतो. सरदार पटेल यांनी संकल्प केला नसता तर देशात एका राज्यातून दुसरीकडे जाण्यासाठी व्हिजा लागला असता, असेही मोदी यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संपूर्ण 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहायची असेल तर त्याचा तिकीट दर 500 रुपये आहे. इथे गेल्यानंतर पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 3 किमी लांब अंतरावर वाहनं पार्क करावी लागतील. तिथून एका बसद्वारे स्मारकापर्यंत पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- देशातील सर्वात कठीण परिस्थितीत वल्लभभाई पटेल देशाचे गृहमंत्री
- देश शाश्वत होता आणि राहणार याचे प्रतिक हा पुतळा
- आदिवासी, शेतकरी यांच्या त्यागाचे कष्टाचे प्रतिक
- साडेतीन वर्षात मिशन मोडवर स्मारक पूर्ण केले
- 31 ऑक्टोबर 2010 ला अहमदाबादमध्ये सर्वात पहिले विचार मांडला
- पटेल यांचे स्मारक म्हणजे देशाचं सामर्थ्य, अर्थव्यवस्था, रोजगाराचे केंद्र होणार, आदिवासींना रोजगार उपलब्ध होणार
- स्मारक बघण्यासाठी आलेले पर्यटक सातपुडा, विंध्यचे दर्शन घेतील
- टुरिस्ट स्पॉट तयार होतील, पर्यटन विकास होईल
- कृषी, आदिवासीचे जीवन चांगले बनविण्यासाठी उपयोग होणार
- आम्ही वेगवेळ्या विभूतींच्या कार्याचा गौरव करतो पण त्याचे राजकारण केले जाते, आम्ही अपराध करतो असे वाटते
राम सुतार यांनी मूर्ती साकारली
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या बांधकाम लार्सन अँड टूब्रो कंपनीने केलं आहे. यानंतर एल अँड टीने पुतळा साकारण्याची जबाबदारी वयाची नव्वदी पार केलेले मराठमोळे चिरतरुण मूर्तीकार राम सुतार यांच्या खांद्यावर सोपवली. ब्राँझच्या आठ मिमी जाडीच्या 7000 हून अधिक शीट्स जोडून या पुतळ्याला आकार देण्यात आला आहे. या पुतळ्याच्या पायथ्याला एक भव्य संग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र बनवलं जाणार आहे. जवळच अडीचशे माणसं एकाच वेळी बसू शकतील असं फूड कोर्ट उभं राहत आहे. याशिवाय आजूबाजूच्या भागातही आणखी काही संकल्पनांवर काम करुन एक संपूर्ण पर्यटन केंद्र उभारण्याचा मानस आहे.
मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमागील राजकारण
पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टची जितकी भव्यता आहे, तितकीच त्यामागील राजकारणाची पार्श्वभूमीही. या पुतळ्याची उंची आणि गुजरातमधील विधानसभा मतदारसंघांची संख्या समान आहे. हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे पटेल समाज दुरावला आहे. सरदार पटेलांचा हा भव्य पुतळा पटेल समाजाला चुचकारण्याचं भाजपचं शस्त्र आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता आहे.
स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
जालना
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
