एक्स्प्लोर

Sanjay Raut Exclusive : किरीट सोमय्यांची प्रकरणं पुढं आल्यावर लोकं त्यांना रस्त्यावर फटकावतील; संजय राऊतांचा हल्लाबोल 

Sanjay Raut Exclusive : संजय राऊत यांनी  किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. सोमय्यांची प्रकरणं पुढं आल्यावर लोकं त्यांना रस्त्यावर फटकावतील, असं राऊतांनी म्हटलं आहे

Sanjay Raut Exclusive On Kirit Somaiya :भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी  किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्यांची प्रकरणं पुढं आल्यावर लोकं त्यांना रस्त्यावर फटकावतील, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. एबीपी माझानं संजय राऊत यांच्याशी लडाखमध्ये खास संवाद साधला. 

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्या आमच्या सहकार्‍यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून शोधतोय ती आहे कुठे? मुंबईत पोहोचल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या फ्रॉडचं, भ्रष्टाचाराचं एक मोठे प्रकरण उघड करणार आहे. किरीट सोमय्यांची भविष्यात जी प्रकरणं पुढे येतील ती पाहिल्यानंतर रस्त्यावर लोकं त्यांना फटकावल्या शिवाय राहणार नाहीत, असं राऊतांनी म्हटलं आहे. 
 
 संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाचे काम आहे भोंग्या शिवाय बोलत राहणं. भोंगे हे विधायक कामासाठी चालत राहिले पाहिजेत. द्वेष निर्माण करण्यासाठी दंगली निर्माण करण्यासाठी तुमचे भोंगे चालवू नका ही महाराष्ट्राची परंपरा नाही. तुम्ही विरोधी पक्षाचे काम उत्तम करत राहा, निवडणुका येतील तेव्हा लोक ठरवतील, असंही ते म्हणाले. 

महाविकास आघाडीत सामील व्हावं, राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, अपक्ष लढायचं असेल तर त्यांनी त्यांच्या हिमतीवर लढावं. महाविकास आघाडीने सहावी जागा लढायची हे एकदा ठरवले आहे. संभाजीराजेंविषयी आमच्या मनात आदर आहे. उद्धवजी त्यांना मानतात. तुमच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांनी महाविकास आघाडीत सामील व्हावं.. मी उभा आहे अपक्ष आणि मला सगळ्यांनी मत द्या असं राजकारणात होत नाही. आधी स्वतःची मतं किती आहेत ते सांगा.आमच्याकडे मते नसतील तर कुणाकडेच नाहीत. शिवसेनेचा उमेदवार जिंकून आणू, असंही ते म्हणाले. 

ब्रजभूषण कुठल्या मातीचे बनले आहेत हे मला चांगलंच माहिती

खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या राज ठाकरे यांना होणाऱ्या विरोधावर बोलताना संजय राऊत म्हणाले की,  ब्रजभूषण कुठल्या मातीचे बनले आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. मी त्यांना 35 वर्षे ओळखतो. त्या माणसाला कधी माघार घेताना पाहिलेले नाही. अयोध्येमध्ये जाणाऱ्या माणसाचं मन साफ असावं लागतं.  आमचे ठाकरे आहेत, त्यांचं अयोध्येशी नातं आहे. आम्ही काही आमचे आमदार वाढावेत खासदार वाढावेत म्हणून जात नाही आम्ही रामराज्याची प्रार्थना करण्यासाठी जात आहोत, असं ते म्हणाले. 

मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना तरी आठवतं का? 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईतील प्रभागरचनेच्या आक्षेपावर आणि मुंबई तुंबण्याच्या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले की,  मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना तरी आठवतं का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. अजूनही काही गोष्टी त्यांच्या अभ्यासातून सुटले आहेत. काँग्रेसच्या वाढीबद्दल आम्हालाही आस्था आहे. एकेकाळी काँग्रेसचं मुंबईवर राज्य होतं पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होतं. पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुंबई कधी तुंबली याची माहिती हवी असेल तर शिवसेनेच्या संदर्भ विभागातून मी पाठवतो, असंही राऊत म्हणाले. 

त्यांनी म्हटलं की, दोन-तीन दिवस लडाखमध्ये आल्यानंतर मी सगळं राजकीय विसरलो. शांतता अनुभवली. राणा दाम्पत्य पण योगायोगाने आता लडाखमध्ये आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, एका संसदीय समितीमध्ये 40 ते 45 लोक असतात सगळे आपापले प्रश्न मांडत असतात आम्ही एकत्र चर्चा करतो. आम्ही एक बीकेसीमध्ये अतिविरासभा घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या देशाच्या प्रत्येक प्रश्नाला हात घातला, असं ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : नवलानी प्रकरणाचा तपास कुठंवर आला? सोमय्यांचा सरकारला सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
UPSC Result : भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
भाजप नेत्याचा मुलगा UPSC परीक्षेत देशात तिसरा, आठ वर्षांच्या मेहनतीला फळ
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget