एक्स्प्लोर
Advertisement
'अँबी व्हॅली' स्वतःकडे राखण्यासाठी 'सहारा' समुहाची धडपड
चेक वटले नाहीत, तर पुन्हा तिहार तुरुंगात जाण्यास तयार राहा, अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं सुब्रतो रॉय यांना तंबी दिली होती.
मुंबई : अँबी व्हॅलीवर पाणी सोडावं लागू नये म्हणून 'सहारा' समुहाची धडपड सुरु आहे. लोणावळ्यातील अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया थांबण्यात यावी, यासाठी सहारा समुहानं सर्वोच्च न्ययालयाला पुन्हा विनंती केली आहे.
आज झालेल्या सुनावणीदरम्यान सहारा समुहानं गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात येतील असं आश्वासनही सर्वोच्च न्यायालयाला दिलं. सध्या सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहेत. त्यांनी कोर्टाला दीड हजार कोटी आणि 550 कोटी इतक्या रकमेचे दोन चेक दिले आहेत.
चेक वटले नाहीत, तर पुन्हा तिहार तुरुंगात जाण्यास तयार राहा, अशा शब्दात कोर्टानं सुब्रतो रॉय यांना तंबी दिली होती.
सहारा समुहाभोवतीचा फास आवळण्यासाठी सुर्वोच्च न्यायालयानं अँबी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे सहारा समुहाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement