एक्स्प्लोर
VIDEO: बान्नेरघाट पार्कमध्ये सफारी कारला सिंहाचा घेराव, थरार कॅमेऱ्यात कैद

बंगळुरू: बंगळुरूतील बान्नेरघाट बायोलॉजिकल पार्कमध्ये एका सफारी कारला चक्क 2 सिंहांनी घेरलं. ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सुरूवातीला सफारी गाडीचा सिंहीणीनं पाठलाग केला आणि गाडी समोर आली. त्यानंतर मागून सिंह आला आणि त्यानं थेट गाडीवर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकानं मोठ्या सावधानीनं गाडी हळूहळू पुढे नेली आणि त्यामुळे सिंहाच्या तावडीतून पर्यटक सुटले. या प्रकारामुळे बंगळुरुतील बान्नेरघाट पार्कमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सफारी कार मागून येणाऱ्या कारमधील पर्यटकांनी ही दृश्यं आपल्या कॅमेरात टिपली. दरम्यान, साधारण वर्षभरापूर्वी असाच काहीसा प्रकार नागपूरच्या उमरेड अभयारण्यातही झाला होता. ठाण्यातल्या एका परिवारासोबत अभयारण्याची सफर करताना दोन वाघ जिप्सीच्या अगदी जवळ आले होते. त्याचं चित्रिकरणही करण्यात आलं होतं. VIDEO: संबंधित बातम्या: जिप्सीजवळ वाघ, दोन कर्मचारी निलंबित
आणखी वाचा























