Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने आईसोबत घेतला मोसमातील पहिल्या आंब्याचा आस्वाद; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला...
Sachin Tendulkar : सचिनने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन आपल्या आईबरोबर आंब्यांचा मनमुराद आनंद घेताना दिसतोय
Sachin Tendulkar Video With Mother : उन्हाळा (Summer Season) आणि आंबा (Mango) यांचं समीकरणच फार वेगळं आहे. फळांचा राजा म्हटला जाणारा आंबा मोठमोठ्या सेलिब्रिटींपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकालाच आपली भुरळ घालतो. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) देखील आंब्याचा मोह टाळता येत नाही. नुकताच सचिनने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Sachin Tendulkar Instagram Account) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन आपल्या आईबरोबर आंब्यांचा मनमुराद आनंद घेताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
सचिनने पोस्टमध्ये म्हटले की....
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर करत सचिनने पोस्टमध्ये लिहीले आहे की, मी माझ्या आयुष्यातील सर्वात स्पेशल व्यक्तीबरोबर या सीझनमधील पहिला आंबा खातोय. यावेळी सचिनने आईसोबत संवाद साधला. विशेष म्हणजे आंबा खात असताना आंबा गोड असल्याची प्रतिक्रियादेखील सचिनच्या आईने दिली.
निवृत्तीनंतर सचिन सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय (Active) आहे. चाहतेही त्याच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. सचिन कधी आपले फोटो शेअर करतो, तर कधी व्हिडीओच्या माध्यमातून तो स्वत:बद्दल किंवा काही खास गोष्टी सांगत असतो. आजदेखील सचिनने असाच खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि चाहत्यांना तो फार आवडला.
सचिनचं आईबरोबर खास नातं
सचिनचं आपल्या आईबरोबर स्ट्रॉंग बॉंडिंग आहे. 2013 मध्ये जेव्हा सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती तेव्हा त्याचा शेवटचा कसोटी सामना पाहण्यासाठी त्याची आईही स्टेडियममध्ये उपस्थित होती. आजचा देखील खास व्हिडीओ सचिनने आपल्या आईबरोबर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
चाहत्यांचा पोस्टला प्रतिसाद
या पोस्टवर सचिनच्या चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. काही मिनिटांतच हजारो यूजर्सनी हा व्हिडीओ पाहिला. इतकंच नाही तर, अर्ध्या तासात या व्हिडीओला 500 हून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ रिट्विटदेखील केला. अनेक चाहत्यांना खास कमेंट्सही केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :