एक्स्प्लोर
एखाद्या बहिणीनं भावाला यापेक्षा मोठं गिफ्ट दिलं नसेल: सचिन मलिक
रोहतक (हरियाणा): रक्षाबंधनच्या दिवशी खरं तर भाऊ बहिणीला भेट देत असल्याची आपल्याकडे प्रथा आहे. पण भारताच्या लेकीनं रिओमध्ये कांस्यपदकाची कमाई करुन संपूर्ण भारतालाच ही 'अमूल्य भेट' दिली आहे.
रक्षाबंधनचा मुहूर्त साधत साक्षी मलिकनं कांस्य पदकाची कमाई केली. त्यानंतर रोहतकमध्ये तिच्या घरी एकच जल्लोष करण्यात आला. तिच्या या विजयानंतर तिच्या कुटुंबीयांना आपले आनंदाश्रू रोखता आले नाही. याचवेळी साक्षीचा भाऊ सचिननं आपली प्रतिक्रिया माध्यमांकडं व्यक्त केली.
'यापेक्षा मोठं गिफ्ट क्वचितच एखाद्या बहिणीनं आपल्या भावाला दिली असेल. आय लव्ह यू साक्षी...' असं म्हणत सचिन मलिकनं आपल्या बहिणीच्या भीमपराक्रमाचं कौतुक केलं.
साक्षीच्या घरीच नाही तर संपूर्ण देशभरात तिच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना तिच्या घरीही जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. संबंधित बातम्या:Isse bada tofah (gift) shayad hi koi behen apne bhai ko de: #SakshiMalik's brother Sachin on her #Rio2016 win pic.twitter.com/wBFll0j8md
— ANI (@ANI_news) August 18, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement