Russian Woman Karnataka: कर्नाटकमधील घनदाट जंगलातील गुहेत रशियन महिला आढळली; पोलीस पोहचताच धक्कादायक माहिती समोर
Russian Woman Karnataka: कर्नाटकमध्ये पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ही रशियन महिला दोन मुलींसह आढळली. पेट्रोलिंग करत असताना या महिलाचा सुगावा लागला.

Russian Woman Karnataka: कर्नाटकमधील घनदाट जंगलातील एका गुहेत रशियन महिला आढळून (Russian Woman Found Karnataka) आली. कर्नाटकमध्ये पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ही रशियन महिला दोन मुलींसह आढळली. पेट्रोलिंग करत असताना या महिलाचा सुगावा लागला. विशेष म्हणजे या रशियन महिलेने गुहेत एक घरही तयार केल्याचं समोर आलं. या रशियन महिलेचा 2017 सालीच संपलाय भारतातला व्हिसा संपल्याचे आढळून आलं. त्यामुळे ही रशियन महिला भारतात किती काळ राहत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
नेमकं प्रकरण काय?
सदर रशियन महिलेचे नाव नीना कुटिना असे असून ती 40 वर्षांची आहे. तिला दोन मुली असून एका मुलीचे वय 6, तर दुसऱ्या मुलीचे वय साधारण 4 वर्षे इतके आहे. 9 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान, या तिघांची पोलिसांनी गुहेतून सुटका केली व सुरक्षितपणे गुहेतून खाली आणण्यात आले. 2017 साली नीना गोव्यात आली होती. त्यानंतर ती कर्नाटकमधील गोकर्ण गावात पोहचली. अध्यात्मिक आयुष्याची ओढ वाटू लागल्याने तिने या गोकर्णमधील घनदाट जंगलात वास्तव्य करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सदर महिला आणि तिचे मुलांनी जंगलात काय खाल्ले, इतके दिवस कसे राहिले?, खूप आर्श्चयकारक असल्याचं पोलिसांनी सांगितले.
Russian woman living in cave with two daughters rescued; found overstaying visa since 2017
— ANI Digital (@ani_digital) July 12, 2025
Read @ANI Story | https://t.co/EhiySCIBK7#Gokarna #Russianwoman #caverescue #expiredvisa pic.twitter.com/qUZzAnD5eA
रशियन महिलेचा शोध कसा लागला?
गोकर्ण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्षीधर एसआर आणि त्यांची एक टीम पर्यटक सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी रामतीर्थ डोंगरावर गस्त घालत होते. यावेळी सर्च ऑपरेशनदरम्यान त्यांना एका अतिशय धोकादायक अशा लँडस्लाईडजवळच्या गुहेत काही हालचाली दिसल्या. यानंतर एका नैसर्गिक तयार झालेल्या या गुहेत नीना दो मुलांसह राहत असल्याचे आढळले. पोलीस दाखल होताच सुरुवातीला नीनाने कुठलीही ओळख दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर महिला बालकल्याण विभागातील एका महिलेला बोलावून नीनाला बोलतं करण्यात आलं. यानंतर नीनाने सगळी माहिती सांगितली. तसेच नीनाने पासपोर्ट हरवल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु पोलिसांनी शोधाशोध केल्यास त्यांना नीनाचा पासपोर्टसह इतर महत्वाची कागदपत्र मिळाली. यावेळी नीनाचा व्हिसा 2017 रोजीच संपल्याचे दिसून आले. दरम्यान, आता या महिलेची सखोल चौकशी केली जात आहे. तिला परत रशियात पाठवण्यासाठी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.























